भाजणीचे वडे - Bhajaniche Vade

Bhajani Vada in English १२ मध्यम आकाराचे वडे वेळ: ३० मिनीटे साहित्य: १ कप थालिपीठाची भाजणी रेसिपीसाठी इथे क्लिक करा २ टेस्पून कोथिंबी...

Bhajani Vada in English

१२ मध्यम आकाराचे वडे
वेळ: ३० मिनीटे

bhajaniche vade, bhajani wade, thalipith bhajani, maharashtrian snacksसाहित्य:
१ कप थालिपीठाची भाजणी रेसिपीसाठी इथे क्लिक करा
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१/२ ते १ टिस्पून लाल तिखट
चिमूटभर हिंग
१/४ टिस्पून हळद
१ टेस्पून तेल मोहनासाठी
तळण्यासाठी तेल
चवीपुरते मिठ

कृती:
१) थालिपीठाच्या भाजणीमध्ये २ टिस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालावे. त्यात कोथिंबीर, लाल तिखट, मिठ, हिंग आणि हळद घालून मिक्स करावे.
२) कोमट पाणी घालून मळून घ्यावे. १५ मिनीटे झाकून ठेवावे. तळणीसाठी तेल गरम करावे. मळलेल्या भाजणीचे साधारण १०-१२ छोटे गोळे करावे
३) प्लास्टिकचा कागदाला थोडा पाण्याचा हात लावून त्यावर हातानेच वडा थापावा आणि मधे भोक पाडून गरम तेलात तळून काढावा.

टीप:
१) जर भाजणी खमंग भाजलेली नसेल तर वडे थोडे मऊ पडतात. तसेच भोक न पाडता वडे बनवले तर ते पुरीसारखे फुगतात आणि नंतर मऊ पडतात.
२) पिठ भिजवताना पिठामध्ये १ टिस्पून तिळ, १/४ टिस्पून ओवा आणि १/२ टिस्पून जिरे घातल्यास चव छान लागते.
३) वडे जर तेलात तुटत असतील तर भिजवलेल्या भाजणीत १ ते २ चमचे गव्हाची कणिक घालावी तसेच तिखट मिठही किंचीत वाढवावे.

Related

Snack 3904879915135383989

Post a Comment Default Comments

 1. mala he vade khop awdtat..pan kadhi try nahi kele..aajch karate ata :)thanks for the wonderful receipes..

  ReplyDelete
 2. वैदेही एकदम मस्तच होतात गं. तोंडाला पाणी सुटले....आता करतेच. :)मोहन न घालताही होतील ना गं?

  ReplyDelete
 3. धन्यवाद भानस,
  अगं भाजणी चांगली खमंग भाजली असेल तर होतात चांगले मोहन न घालता. पण थोडे मोहन घातलेले चांगले नाहीतर मऊ होतात.

  ReplyDelete
 4. Hi वृषाली,
  अगं मला पण भयंकर आवडतात हे वडे. बाकी कमेंटसाठी धन्यवाद

  ReplyDelete
 5. Hi Vaidehi,
  Mala mazya lahanpanachi athavan ali. Mazi aai he vade agadi sundar karate. Amhi kombadhi che kalvan ani he vade khaycho. Waa mala ata athavun tondala pani sutle. Aaj itkya divsani tuzyamule mala te chhan divas athavle.

  ReplyDelete
 6. Hello vaidehi,

  ajach m kelele vade yummi zalele nd mast paus padat hota so ajun tasty lagale!!!!
  but vade tuzya vadyan pramane fulale nahe as ka zal asel???
  shweta528

  ReplyDelete
 7. Hi Shweta

  aga thodya practicene yeil.. pith kitpat ghatta malave kinva gas chi aach kitivar thevaychi tyacha ekda andaz ala ki nantar nit fultil.

  ReplyDelete
 8. Hi vaidehi,
  Apan bhajniche dhirde kru shakto ka?
  Just for curiosity coz vade oily astat na? :-)
  --
  Prachi

  ReplyDelete
 9. Hi Prachi

  Ho chalel.. dhirde suddha chhan hotat.

  ReplyDelete
 10. Thanks vaidehi.
  --
  Prachi

  ReplyDelete
 11. Wow malaa he vade khul avdtat .mi aaj banvnar ahe .fakt tandul pith vaprun thalipith banvta yete tar vade sudha tase banai shakato ka

  sampi

  ReplyDelete
  Replies
  1. tandalachya pithache suddha vade banavta yetat. pan bhajani sarkha khamang pana nahi yenar.

   Delete
  2. Bhajanichya pithat dali sudha ghetat k?????

   Delete
  3. bhajani recipe chi link me sahitya madhye dili ahe..

   Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item