चिंचगूळातील भेंडी - Chinch gulachi Bhendi

Sweet Sour Okra Curry in English ३ ते ४ जणांसाठी वेळ: साधारण ३५ मिनीटे साहित्य: पाव किलो भेंडी १ टेस्पून तेल फोडणीसाठी: १/४ टिस्पून ...

Sweet Sour Okra Curry in English

३ ते ४ जणांसाठी
वेळ: साधारण ३५ मिनीटे

chinch gulachi bhendi, bhendi curry, sweet and sour okra curryसाहित्य:
पाव किलो भेंडी
१ टेस्पून तेल
फोडणीसाठी: १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, ४-५ कढीपत्ता पाने
२ टेस्पून खवलेला नारळ
मोठ्या लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ
१ टेस्पून गूळ
१ टेस्पून शेंगदाणा कूट
२ टिस्पून गोडा मसाला
चवीपुरते मिठ
कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) भेंडी धुवून घ्यावी. स्वच्छ कपड्याने कोरडी करून गोल चकत्या करून घ्याव्यात.
२) चिंच पाण्यात भिजवून त्याचा कोळ करून घ्यावा. कोळात १ भांडे पाणी घालावे.
३) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. ताजा नारळ घालून काही सेकंद परतावा.
४) नंतर चिरलेली भेंडी घालून दोनेक मिनीटे मोठ्या आचेवर परतावे. त्यात चिंचेचे पाणी घालावे. मिठ घालावे आणि मध्यम आचेवर झाकण ठेवून भेंडी शिजेस्तोवर वाफ काढावी. गरज वाटल्यास पाणी वाढवावे.
५) भेंडी शिजत आली कि त्यात गूळ, गोडा मसाला, आणि शेंगदाण्याचा कूट घालून एक दोन वेळा उकळी काढावी.
कोथिंबीर घालून चिंचगूळाची भेंडी गरमागरम तूप भाताबरोबर वाढावी.

Labels:
Okra curry, Chinch gulachi bhendi

Related

Rassa Bhaji 2808036255660141754

Post a Comment Default Comments

  1. सुरेख भाजी तोंडाला पाणी सुटले

    ReplyDelete
  2. Hello Vaidehi,
    Jar Bhendimadhe Pani ghatale tar ti chikat hote naa ?......Bhaji chikat tar honar nahi naa ?....pls reply then i will try.....
    Rgds,
    Mayuresh

    ReplyDelete
  3. Hello Mayuresh

    Chinchechya ambatpanamule bhendicha chikatpana nighun jato..

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item