नागपंचमी स्पेशल दिंडं - puranache Dind
Dind in English साधारण ८ दिंडं वेळ: अंदाजे १ ते दिड तास साहित्य: ३/४ कप चणाडाळ ३/४ कप गूळ ३/४ कप कणिक २ टेस्पून तेल चिमूटभर मिठ १...
https://chakali.blogspot.com/2009/07/puranache-dind.html?m=0
Dind in English
साधारण ८ दिंडं
वेळ: अंदाजे १ ते दिड तास
साहित्य:
३/४ कप चणाडाळ
३/४ कप गूळ
३/४ कप कणिक
२ टेस्पून तेल
चिमूटभर मिठ
१/४ टिस्पून वेलचीपूड किंवा जायफळ पूड
कृती:
१) प्रथम पुरणपोळीसाठी जसे बनवतो तसे पुरण बनवून घ्यावे. त्यासाठी चणाडाळ धुवून मऊसर शिजवून घ्यावी (साधारण चणाडाळीच्या अडीच ते तीनपट पाणी घालावे). डाळ शिजली कि चाळणीत घालून पाणी निथळू द्यावे.
२) डाळीतील पाणी निघून गेल्यावर हि डाळ पातेल्यात घ्यावी. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना ढवळत राहावे. जर ढवळायचे थांबवले तर मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात वेलचीपूड घालावी. हि डाळ आपण पुरणयंत्रातून बारीक करणार नाही आहोत. म्हणून पळीने चांगली घोटून घ्यावी.
३) मिश्रण घट्टसर झाले कि पातेले गॅसवरून उतरवावे. पुर्ण गार होवू द्यावे.
४) कणकेत मिठ घालावे. त्यावर २ टेस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून घट्टसर मळून घ्यावी. थोडावेळ झाकून मुरू द्यावी.
५) कणकेचे ८ ते १० गोळे करावे. जर मोदकपात्र असेल तर त्यामध्ये २ लिटर पाणी गरम करत ठेवावे. नाहीतर मोठ्या पातेल्यात पाणी गरम करावे. त्यावर बसणारी चाळणी ठेवून त्यावर सुती कपडा घालावा. कणकेच्या गोळ्याची पातळ पुरी लाटावी, मधोमध १ चमचा पुरण ठेवावे व समोरासमोरील बाजू पुरणावर ठेवून चौकोनी आकारात बंद करावे. मोदकाप्रमाणे १५ ते २० मिनीटे शिजवून घ्यावे.
गरमागरम दिंडं तूप घालून नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य दाखवावा.
टीप:
१) काही लोकांना उकडलेली दिंडं आवडत नाहीत. अशावेळी चवीखातर पुरण शिजवताना त्यात थोडा ताजा नारळ, काजू, भाजलेली खसखस घालावी आणी करंजी किंवा वरीलप्रमाणे आकार देऊन तुपात किंवा तेलात तळून काढावेत.

wow!! parava nakki karun baghen.
ReplyDeletemala methichi bhajichi(besan pith perun) recipe sangal ka?
Hi Asmita,
ReplyDeletemethichi recipe nakki taken
wow bhuk ch lagli ki aaj ch ghari gelyawer karun baghel mala ukdlele recipes khup awdtat chakolya, ukdiche modak hyachya recipe takshil ka khas karun tandalache ukdiche modak hi kase karyche te plz snag mi baryach veles kele pan te panchet hotat mhanje sweetless hotat ase ka hote??
ReplyDeleteNilima
Vaidehi
ReplyDeleteGul kisayla kahi sopa upay aahe ka?
Dhanyawad
gool jar kisanivar kista jamat nasel tar vilivar bhaji chirto tase gul chirava fakt khup kalajipurvak chirava..tasech dhardar suri asel tar gulache patalsar kaap kadhata yetat
ReplyDeletewow!khupch chan!
ReplyDeleteThank you so much for Dind Recipe
ReplyDeleteAs It helps a lot if anybody is out of our own state.
I have tried and It was very nice.
If possible, please share Dandagel Recipe (Maharashtrian Paramparic Padarth)