लसणीचे वरण - Lasaniche Varan
Garlic Dal in English वाढणी: साधारण दिड ते २ कप (२ जणांसाठी) साहित्य: १/२ कप तुरडाळ २ लसूण पाकळ्या ३ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबी...
https://chakali.blogspot.com/2008/09/lasaniche-varan-indian-dal-recipe.html?m=0
Garlic Dal in English
वाढणी: साधारण दिड ते २ कप (२ जणांसाठी)
साहित्य:
१/२ कप तुरडाळ
२ लसूण पाकळ्या
३ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
३-४ कढीपत्ता पाने
फोडणीसाठी: १ टिस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
२ टिस्पून लिंबाचा रस
मिठ
कृती:
१) १/२ कप तुरडाळ स्वच्छ धुवून प्रेशर कूकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावी.नंतर रवीने किंवा चमच्याने घोटून घ्यावे.
२) लसणीच्या पाकळ्या सोलून बारीक चिरून घ्याव्यात. मिरच्या उभ्या चिरून घ्याव्यात.
३) कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि मिरच्या
फोडणीत घालून १५ सेकंद परतावे. कोथिंबीर घालावी आणि ५-७ सेकंद परतून घोटलेली डाळ घालावी.आवश्यकतेनुसार पाणी घालावे.मिठ घालावे. १-२ वेळा उकळी काढावी. लिंबाचा रस घालावा.
हे लसणीचे वरण गरम गरम तूप-भाताबरोबर वाढावे.
Labels:
Dal Tadka, phodaniche varan, lasun dal, lasoon dal, Maharashtrian Dal

जादुगार कसे आपल्या पोतडीतुन एकेक नविन्यपुर्वक प्रकार काढत असतात, त्याची आज आपल्या ब्लॉग वरच्या रेसीपी वाचतांना आठवण झाली
ReplyDeletemast pakkruti aahe. tondala pani sutate
ReplyDeleteधन्यवाद श्रद्धा कमेंटसाठी
ReplyDeleteHI VAIDEHI
ReplyDeleteSAGALYACH RECIPES KHUP CHHAN AHET
AAJKAL MI TUZA BLOG WACHUNACH MENU THARAVATE
VACHALYAVAR HI RECIPE KADHI KARATE ASA HOT
thanks Poorva
ReplyDeleteHi,
ReplyDeleteVaidehi
Khup Chhan Blog aahe ha.. yamadhil kahi RCP mazya Ajichi athvan karun detat...aani mi tar office madhe vel asel tevha print kadhun ghete javal javal 200 Print mi aataparyant kadlya aahet... Thanks Vaidehi...
Aparna
Thanks Aparna
ReplyDeletevatlrya kobryach varnachi recipe post karana plz...
ReplyDelete