पाणीपुरीचे स्टफिंग - Filling For Pani Puri

Stuffing For Pani Puri in English प्रत्येक स्टफिंग ३ ते ४ जणांसाठी वेळ: प्रत्येकी १० ते १५ मिनीटे  (कडधान्यं उकडल्यावर) पाणीपुरीचे फि...

Stuffing For Pani Puri in English

प्रत्येक स्टफिंग ३ ते ४ जणांसाठी
वेळ: प्रत्येकी १० ते १५ मिनीटे  (कडधान्यं उकडल्यावर)

variety of stuffing like boondi, boiled potato, mung for panipuri
पाणीपुरीचे फिलिंग - १
साहित्य:
३/४ कप हिरवे मूग
चिमूटभर हळद (ऐच्छिक)
चवीपुरते मीठ
कृती:
१) मूग ८ ते ९ तास कोमट पाण्यात भिजवावेत. त्यांना मोड काढून ते शिजवून घ्यावे. शिजवताना थोडे मीठ घालावे.
टीप: शिजवताना चिमुटभर हळद घालावी. त्याने मूगाचा उग्रपणा कमी होतो तसेच रंगही येतो.

पाणीपुरीचे फिलिंग - २
साहित्य:
३/४ कप पांढरे वाटाणे
चिमूटभर हळद
चवीपुरते मीठ
कृती:
पांढरे वाटाणे  ६ तास कोमट पाण्यात भिजवावेत. ते मऊ शिजवून घ्यावे. शिजवताना थोडे मीठ घालावे.
टीप: शिजवताना चिमुटभर हळद घालावी. त्याने वाटाण्याचा उग्रपणा कमी होतो तसेच रंगही येतो.

पाणीपुरीचे फिलिंग - ३
साहित्य:
३/४ कप हिरवे मूग
१ उकडलेला बटाटा
चाट मसाला
मीठ

कृती:
मूग वरील कृतीप्रमाणे मोड आणून शिजवून घ्यावे. उकडलेला बटाटा नीट कुस्करून घ्यावा. त्यात शिजलेले मूग घालावे, चवीपुरते मीठ आणि चाट मसाला घालावा.

पाणीपुरी फिलिंग - ४
साहित्य:
२ उकडलेले बटाटे
१/२ टिस्पून भाजलेले जिरे, कुटून
चवीपुरते मीठ
चिमूटभर लाल तिखट
१ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून

कृती:
१) बटाटे सोलून कुस्करून घ्या. त्यात कुटलेले जिरे आणि मीठ घालून मिक्स करा.
२) एका मध्यम वाडग्यामध्ये हे मिश्रण काढून त्यावर लाल तिखट आणि कोथिंबीर पेरून सजवा.

पाणीपुरी फिलिंग - ५
साहित्य:
१/२ कप खारी बुंदी किंवा मसाला बुंदी
कृती:
पुरीला भोक पाडून त्यात १ टीस्पून बुंदी भरावी त्यात तिखट-गोड पाणी भरून पाणीपुरी खावी.
किंवा तिखट पाण्यात बुंदी घालावी त्यामुळे बुंदी फुलेल. तिखट पाणी आणि फुगलेली बुंदी पुरीत भरावी आणि खावी.

पाणीपुरी फिलिंग - ६
साहित्य:
१/४ कप कैरीचे बारीक काप
चिमूटभर मीठ
चिमूटभर लाल तिखट
कृती:
कैरीच्या कापांवर लाल तिखट आणि मीठ पेरावे आणि वरील कोणत्याही स्टफिंग बरोबर पाणीपुरीत भरून खावे.

Related

Snack 437555543745869046

Post a Comment Default Comments

 1. panipurichi puri kashi karavi . Aai kade astana amhi puri gharich karat asu. Ekada me try karun pahili pan puri kurkurit zali nahi jar mahit asel tar kalav  ReplyDelete
 2. दहीवडा पध्दत सांगावी सौ.किरण थोरहाते

  ReplyDelete
 3. I like your chakli blog. Preparation is always made easy by you

  ReplyDelete
 4. An pani purich pani kas banavaych?

  Purva

  ReplyDelete
 5. Stuffing 4 & 5 are very easy to prepare ...just loved it... Thank you so much for the recipe ... :-)

  ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item