कॉर्न चाऊडर - Corn Chowder

Corn Chowder in English Time: 20 minutes Serves: 2 साहित्य: पाऊण कप स्वीट कॉर्न १/४ कप रेड कॅप्सिकम, लहान चौकोनी तुकडे १/४ कप कांदा...

Corn Chowder in English

Time: 20 minutes
Serves: 2


साहित्य:
पाऊण कप स्वीट कॉर्न
१/४ कप रेड कॅप्सिकम, लहान चौकोनी तुकडे
१/४ कप कांदा, बारीक चिरून
१ लहान बटाटा, सोलून मध्यम चौकोनी तुकडे
२ ते ३ फरसबीच्या शेंगा, मध्यम तुकडे
३-४ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१/४ ते १/२ टिस्पून लाल मिरची पावडर
२ टिस्पून बटर
१ टेस्पून मैदा
२ ते ३ टिस्पून साय, फेटून
चवीपुरते मीठ, मिरपूड
किसलेले चीज आवडीनुसार

कृती:
१) स्वीट कॉर्न मायक्रोवेव्हमध्ये २ मिनिटे वाफवून घ्यावे.
२) बटर पातेल्यात गरम करावे. त्यात आधी बटाटा घालून १ वाफ काढावी. नंतर रेड कॅप्सिकम, कांदा, फरसबी आणि स्वीटकॉर्न घालून मिक्स करावे.
३) १-२ मिनिटे परतून त्यात २ ते ३ वाट्या पाणी घालावे. उकळी येउ द्यावी.
३) वाटीत थोडे पाणी घेउन त्यात मैदा मिक्स करावा. हे मिश्रण पातेल्यात घालावे. उकळू द्यावे.
४) लाल तिखट, मीठ आणि मिरपूड घालावे. स्ट्यू गरम असतानाच चीज घालून मिक्स करावे.
सर्व्ह करताना किसलेले चीज घालून सजवावे.
५) कॉर्न चाऊडर टोस्टेड ब्रेड बरोबर सर्व्ह करावे.

Related

Soup 6974207794517714711

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item