पातीकांद्याचे पोहे - Patikandyache Pohe
Patikandyache Pohe in English वेळ: २० ते २५ मिनीटे वाढणी: ३ ते ४ प्लेट साहित्य: १ मध्यम पतीकांद्याची जुडी, बारीक चिरून २ कप जाडे प...
https://chakali.blogspot.com/2015/05/patikandyache-pohe.html
Patikandyache Pohe in English
वेळ: २० ते २५ मिनीटे
वाढणी: ३ ते ४ प्लेट
साहित्य:
१ मध्यम पतीकांद्याची जुडी, बारीक चिरून
२ कप जाडे पोहे
फोडणीसाठी:
२ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/८ टिस्पून हिंग, १/४ चमचा हळद
५-६ पाने कढीपत्ता
३-४ हिरव्या मिरच्या, चिरून
१/४ कप शेंगदाणे
१/२ कप खोवलेलं ओलं खोबर
चवीपुरते मीठ आणि साखर
कृती:
१) पोहे चाळणीत घेउन भिजवावेत. अधिकचे पाणी निथळू द्यावे.
२) कढईत तेल गरम करावे. त्यात शेंगदाणे आधी तळून बाजूला काढून ठेवावे.
३) त्याच तेलात मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरच्या घालून फोडणी करावी. चिरलेला पाती कांदा (पात आणि कांदा दोन्ही) फोडणीला टाकावा. मीठ घालावे. मंद आचेवर वाफ काढावी.
४) पात शिजली की भिजलेले पोहे घालून व्यवस्थित मिक्स करावे. तळलेले शेंगदाणे घालावे. चवीपुरती साखर आणि लागल्यास अजून थोडे मीठ चव पाहून घालावे. ओलं खोबरं घालून मंद आचेवर पोहे शिजू द्यावेत. अधून मधून ढवळावे.
टीप:
१) यात पाती कांद्याचे प्रमाण कमी जास्त करून करू शकतो. वरील प्रमाणापेक्षा अजून थोडे जास्त पाती वापरली तर छान हिरवा रंग येतो पोह्यांना.

Maze pohe barechda mau hot nahit, tadtadit hotat. any suggestions for how to make it soft & fluffy?
ReplyDeletePohe nit bhijalele asavet mhanje khup jast vel panyakhali dharu naye. tyamule pohyancha gichka hoto.. tasech agadi kami vel suddha bhijavu naye.
Deletepohe fodanila takle ki madhyam achevar nit mix karave. mand achevar vaaf kadhavi. pohe korde vatalyas panyacha habka marava.
jast vel vaaf kadhu naye tyamule pohe talala kadakadit hotat.
Chalnit n thevta bhandyatil pohe pani nithlun tyatch thevave zakan thevave tymule pohe must bhjtat and changle naram rahatat.
Delete