बीट ऑरेंज सलाड - Beet and Orange Salad

Beet and Orange Salad in English वेळ: १५ मिनिटे २ जणांसाठी साहित्य: २ संत्री १ बीट सलाड ड्रेसिंगसाठी १/४ कप ऑरेंज ज्यूस १ टेस्पून...

Beet and Orange Salad in English

वेळ: १५ मिनिटे
२ जणांसाठी


साहित्य:
२ संत्री
१ बीट
सलाड ड्रेसिंगसाठी
१/४ कप ऑरेंज ज्यूस
१ टेस्पून मध
२ चिमटी मिरपूड
२-३ चिमटी मोहोरी पावडर (पिवळी)
चवीपुरते मीठ
१ टिस्पून ऑलिव्ह ऑईल

कृती:
१) संत्री सोलून घ्यावीत. आतील फोडीही सोलाव्यात पण काळजी घ्यावी की आतील त्या अख्ख्या राहतील, बिया काढून टाकाव्यात
२) बीट उकडून घ्यावे. साले काढून मध्यम आकाराच्या उभ्या फोडी कराव्यात.
३) सलाड ड्रेसिंगसाठी ऑरेंज ज्यूस, मध, मिरपूड, मीठ आणि मोहोरी पावडर एकत्र करून मिक्स करावे. यात ऑलिव्ह ऑईल घालून छान एकजीव करून घ्यावे.
४) प्लेटमध्ये बीट आणि संत्र्याच्या फोडी अरेंज कराव्यात. त्यावर गरजेपुरतंच सलाड ड्रेसिंग घालावे. सलाड सर्व्ह करावे किंवा थोडे थंड करून सर्व्ह करावे.

Related

Salad 777141259977889594

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item