मिंटी वेजिटेबल रोल्स - Minty Vegetable Rolls
Minty Vegetable Rolls in English वेळ: १० मिनिटे ४ रोल्स साहित्य: ४ पोळ्या (चपात्या) २ मध्यम बटाटे, उकडून सोललेले १ काकडी, सोललेली ...

वेळ: १० मिनिटे
४ रोल्स
साहित्य:
४ पोळ्या (चपात्या)
२ मध्यम बटाटे, उकडून सोललेले
१ काकडी, सोललेली
१ मोठा टॉमेटो
१ मध्यम कांदा
पुदिना चटणी
चाट मसाला
थोडसं मीठ
कृती:
१) टॉमेटो, बटाटा, कांदा, आणि काकडी यांचे उभे काप करून घ्यावे. (आवडीनुसार लहान तुकडे केले तरी चालेल). भाज्यांचे ४ समान भाग करावे.
२) पोळीवर चटणी लावावी. मध्यभागी भाज्यांचा १ भाग उभा ठेवावा. थोडे मीठ आणि चाट मसाला भुरभुरावा. रोल करून घ्यावा.
३) तव्यावर थोडे तूप किंवा तेल घालून रोल हलकासा भाजून घ्यावा.
सुरीने तुकडे कापून घ्यावे टॉमेटो केचप बरोबर सर्व्ह करावा.