खजुराचे लोणचे - Dates Pickle

Dates Pickle in English वेळ: ५-१० मिनिटे सव्वा कप साहित्य: १ कप खजुराचे मध्यम तुकडे १/२ कप गूळ, चिरलेला १ टेस्पून लिंबाचा रस १ टिस...

Dates Pickle in English

वेळ: ५-१० मिनिटे
सव्वा कप


साहित्य:
१ कप खजुराचे मध्यम तुकडे
१/२ कप गूळ, चिरलेला
१ टेस्पून लिंबाचा रस
१ टिस्पून आल्याच्या पातळ आणि लहान चकत्या
३-४ हिरव्या मिरच्या, मध्यम तिखट, बारीक चिरून (किंवा लाल तिखट वापरले तरी चालेल)
चवीपुरते मीठ (साधारण १/२ ते १ टिस्पून)

कृती:
१) गूळ एका जाड पातेल्यात घ्यावा. त्यात २-३ चमचे पाणी घालावे (साधारण गुळ फक्त भिजला पाहिजे). मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळेस्तोवर ढवळावे. गुळ वितळला की आच बंद करावी.
२) गूळ थोडा कोमट होवू द्यावा.
३) नंतर त्यात आल्याच्या चकत्या, मिरची, लिंबाचा रस आणि मीठ घालून मिक्स करावे. त्यात खजूर घालावा.
हे लोणचे लगेच खाल्ले तरी चालेल.

टीप:
१) सर्व साहित्य ताजं असायला हवं. फ्रीजमधील मिरची, लिंबू वापरू नये. यामुळे लोणचे टिकत नाही.

Related

Pickle / Preserve 2024407228420848262

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item