जांभळाचे सरबत - Jambhalache Sarbat

Jambhul Sarbat in English वेळ: १५ मिनिटे वाढणी - ४ साहित्य: २० ते २५ मोठी पूर्ण पिकलेली जांभळं साखर १ ते २ टिस्पून लिंबाचा रस मीठ ...

Jambhul Sarbat in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी - ४


साहित्य:
२० ते २५ मोठी पूर्ण पिकलेली जांभळं
साखर
१ ते २ टिस्पून लिंबाचा रस
मीठ

कृती:
१) स्वच्छ धुतलेली जांभळं एका पातेल्यात घ्यावीत. अगदी थोडेसे पाणी घालावे. जांभळे कुस्करून त्यातील बिया काढून टाकाव्यात.
२) मध्यम आचेवर जांभळे ३-४ मिनिटे शिजवावीत. यामुळे रंग थोडा गडद होईल. नंतर थंड होवू द्यावे. मिक्सरमध्ये बारीक वाटावे. गाळून त्यातील रस काढून घ्यावा.
३) हा रस जितका असेल त्याच्या दुप्पट साखर एका पातेल्यात घ्यावी. साखर भिजेल इतके पाणी घेउन त्याचा पाक करायला घ्यावा. गोळीबंद पाक करावा.
४) पाकात लिंबाचा रस घालावा. पाक थोडा निवू द्यावा. नंतर त्यात जांभळाचा रस घालून मिक्स करावे.
५) गरजेइतके पाणी घालून थोडे मीठ घालावे. गार सर्व्ह करावे.

टीप:
१) जास्त जांभळं घेउन त्याचा वरीलप्रमाणे सरबत तयार करून फ्रीजमध्ये तयार करून ठेवावे. गरजेप्रमाणे वापरता येईल.

Related

Summer 4184893308823064920

Post a Comment Default Comments

  1. Where do we get jambhul in US?

    ReplyDelete
  2. पाकात लिंबू रस चवीला ? की टीकण्यासाठी?

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item