पावभाजी पराठा - Pavbhaji Paratha

Pavbhaji Paratha in English वेळ: १० ते १५ मिनिटे ४  ते ५ मध्यम पराठे साहित्य: १/२ कप पावभाजी (उरलेली) अंदाजे १/२ कप गव्हाचे पीठ (थ...

Pavbhaji Paratha in English

वेळ: १० ते १५ मिनिटे
४  ते ५ मध्यम पराठे


साहित्य:
१/२ कप पावभाजी (उरलेली)
अंदाजे १/२ कप गव्हाचे पीठ (थोडे कमी-जास्त होवू शकेल)
१/२ टिस्पून लाल तिखट
चवीनुसार मीठ

कृती:

१) पावभाजी हाताने थोडी कुस्करून घ्या. त्यात कणिक, लाल तिखट आणि मीठ घालावे. पाणी अजिबात घालू नये. जेवढी मावेल इतकीच कणिक घालायची आहे. मळून गोळा तयार करावा.
२) मोठ्या लिंबाएवढे गोळे करून त्याचे पराठे लाटावे. तव्यावर शेकताना थोडे तेल किंवा बटर सोडावे. आच मध्यम ठेवावी. पराठा खरपूस भाजून घ्यावा.
सर्व्ह करताना पराठा प्लेटमध्ये काढून त्यावर किसलेले चीज घालून सजावट करावी.

टीप:
१) लहान मुलांसाठी बनवताना लाल तिखट घालू नये.

Related

Paratha 3991448119623230609

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item