कोल्सलॉ सॅंडविच - Coleslaw Sandwich

Coleslaw Sandwich in English वेळ: १० मिनिटे ४ सॅंडविचेस साहित्य: ८ सॅंडविच ब्रेड स्लाईसेस २ टेस्पून बटर १/२ कप पातळ चिरलेला कोबी ...

Coleslaw Sandwich in English

वेळ: १० मिनिटे
४ सॅंडविचेस

साहित्य:
८ सॅंडविच ब्रेड स्लाईसेस
२ टेस्पून बटर
१/२ कप पातळ चिरलेला कोबी
१/२ कप जरा जाड किसलेले गाजर
३ ते ४ टेस्पून मेयॉनीज
१ ते २ टेस्पून दूध
१/२ टिस्पून व्हिनेगर
२ ते ३ चिमटी मिरपूड
१/२ टिस्पून रेड चिली फ्लेक्स
१ टिस्पून साखर

कृती:
१) एका लहान वाडग्यात कोबी, गाजर, मेयॉनीज, चिली फ्लेक्स, साखर आणि थोडेसे दूध घालून मिक्स करावे. चव पाहून लागल्यास थोडेसे व्हिनेगर आणि मिठ घालावे.
२) ब्रेडच्या तुकड्यांना बटर लावून घ्यावे. तयार कोल्सलॉचे ४ सारखे भाग करून घ्यावे. दोन ब्रेडच्या मधे १ भाग समान पसरावा.
सॅंडविचचे २ त्रिकोणी भाग करून सर्व्ह करावे.

टिप:
१) मेयॉनीज गरजेनुसार कमी जास्त करावे.
२) मेयॉनीजमध्ये मिठ आणि व्हिनेगर असते. त्यामुळे मिठ आणि व्हिनेगर गरज लागल्यासच घालावे.

Related

Snack 9198049661826422729

Post a Comment Default Comments

 1. Mayonise avadat naslyas doosra Kahi option aahe ka ?

  Sonali

  ReplyDelete
 2. Very simple recipe. Even children can do it as it requires no heating on gas.. Thank u

  ReplyDelete
 3. Mayonnaise avadat nasalyas thode sour cream kiva cream cheese vaparu shakato.

  ReplyDelete
  Replies
  1. Ho Sour cream kiva cream cheese suddha chhan lagel.

   Delete
 4. selari means wht??

  ReplyDelete
 5. selari manje kai?? india madhe he kuthe milel??

  ReplyDelete
  Replies
  1. Celery mhanje ek prakarchi bhaaji aste. Ti generally salad, soups madhye vapartat.
   General market madhye milayla kathin ahe. pan Godrej Natures Basket madhye nakki milel.

   Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item