रताळे कचोरी - Ratale Kachori

Sweet Potato Kachori in English वेळ: ४० मिनिटे १० मध्यम कचोऱ्या साहित्य: १ कप उकडून कुस्करलेले रताळे ३ ते ४ टेस्पून शिंगाडा पीठ चवीप...


वेळ: ४० मिनिटे
१० मध्यम कचोऱ्या

साहित्य:
१ कप उकडून कुस्करलेले रताळे
३ ते ४ टेस्पून शिंगाडा पीठ
चवीपुरते मीठ
तळणीसाठी तेल
सारण:
१ कप ताजा खोवलेला नारळ
३-४ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेल्या किंवा ठेचलेल्या
२ चमचे कोथिंबीर, बारीक चिरून
१५-२० बेदाणे
१/२ टीस्पून जिरे
१ टीस्पून तूप
चवीपुरते मीठ
१/२ चमचा साखर (ऐच्छिक)

कृती:
१) रताळे उकडून सोलावे. जर त्यात दोरेदोरे असतील तर चाळणीतून गाळून घ्यावे.
२) उकडलेले रताळे बोलमध्ये घेउन कुस्करावे. मीठ आणि शिंगाड्याचे पीठ घालावे. मऊसर गोळा बनवावा. १५ मिनिटे झाकून ठेवावा.
३) या १५ मिनिटात सारण बनवावे. कढईत तूप गरम करावे. त्यात जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, बेदाणे आणि नारळ घालावा. मीठ आणि थोडीशी साखरही घालावी. नीट परतून कोरडे सारण बनवावे.
४) मळलेल्या पीठाचे १ इंचाचे गोळे बनवावे. लाटून छोटी पुरी बनवावी. आत १ चमचा सारण घालून कडा जुळवून कचोरी बांधावी. अशाप्रकारे सर्व कचोऱ्या बनवाव्यात.
५) कचोऱ्या मध्यम आचेवर तुपात किंवा शेंगदाणा तेलात तळाव्यात. झाऱ्याने कचोऱ्या हलवत ठेवाव्यात म्हणजे समान टाळल्या जातील. कचोऱ्या सोनेरी रंगावर तळून काढाव्यात.
हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.

टीपा:
१) कचोऱ्या गरमच खाव्यात. थंड झाल्यावर चांगल्या लागत नाही.
२) सारणात तळलेले काजूचे तुकडे घालू शकतो.

Related

Sweet Potato 441751702102306436

Post a Comment Default Comments

 1. hi, vaidehi
  khup chhan rcp aahe nakki karun pahnar aahe... pan ratala & shingada pith yachi puri latata yete ka? karan ratalyamule puri futu shakte na...

  Aparna

  ReplyDelete
 2. Thanks Aparna,

  Ho puri latata yete. Thodese tel lavun mag latavi mhanje ajibat chikatat nahi. Kinva hatanech dabun pari karavi, modakala karto tashi.

  ReplyDelete
 3. shingada pith nasel tar maida vaprala tar chalte ka?

  ReplyDelete
 4. mast CH ahe RCP khup chhan thank u tai...

  ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item