तिळाच्या वड्या - Tilachya Vadya

Tilachya Vadya in English वेळ:  २५ मिनिटे २४ मध्यम वड्या साहित्य: १/२ कप भाजलेले तीळ १/२ क...


वेळ:  २५ मिनिटे
२४ मध्यम वड्या

साहित्य:
१/२ कप भाजलेले तीळ
१/२ कप किसून भाजलेले सुके खोबरे
१/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
४ टेस्पून मिल्क पावडर
१/२ कप साखर, वरपर्यंत भरून
१/४ कप पाणी
१/२ टीस्पून वेलची पूड

कृती:
१) भाजलेले तीळ मिक्सरमध्ये भरडसर वाटा. पूर्ण पावडर करू नका. फक्त तीळ मोडायचे आहेत.
२) भरड तीळ, खोबरे, शेंगदाणे कूट, वेलची पूड आणि मिल्क पावडर तयार ठेवावे. टीनचा ट्रे तयार ठेवावा. आतून तूप लावून घ्यावे. जर टीन ट्रे नसेल तर पोळपाटाला तूप लावून घ्यावे.
३) साखर आणि पाणी एकत्र करावे. उकळी काढून एक तारी पाक करावा. यात वरील मिश्रण घालावे. ढवळून ट्रेमध्ये ओतावे. समान पसरवून घ्यावे. वाटल्यास वरून थोडे किसलेले खोबरे घालावे. प्लास्टिक पेपरला तुपाचा हात लावून खोबरे थोडे प्रेस करावे.
४) गरम असतानाच तुपाचा हात लावलेल्या सुरीने चौकोनी काप करून खुणा आखून घ्याव्यात. मिश्रण थंड झाले कि वड्या विलग कराव्यात.

Related

Winter 6448645347916325432

Post a Comment Default Comments

 1. hii Vaidehi!!!
  tujhe idea faar chan vatli...
  me karun pahile...
  chan jhale ahet, ghari saglyanna aavadle... :D


  regards kahitarivagale.blogspot.com

  ReplyDelete
 2. Can we use milk instead milk-powder ?

  ReplyDelete
 3. Dudh ghatale tar mishran patal hoil. Vatalyas Khava ghalu shakta.

  ReplyDelete
 4. Hi vaidehi

  Makarsankrantichya hardik Shubecha.

  Mi aaj tumcya recipe pramane tilachya vadya banvlya aani tya mast zalya.

  sarvana aavdlya mi tyat additionally kaju aani badam bhajun krush karun ghatle

  Thank you.

  shraddha Dhuri

  ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item