बटाटा फ्रॅंकी - Bombay Potato Frankie
Potato Frankie in English वेळ: ४० मिनिटे ६ मध्यम फ्रॅंकीज साहित्य: १ कप उकडून कुस्करलेले बटाटे १/२ कप ब्रेड क्रम्स १ टेस्पून हिरवी...
https://chakali.blogspot.com/2012/08/bombay-potato-frankie.html
Potato Frankie in English
वेळ: ४० मिनिटे
६ मध्यम फ्रॅंकीज
साहित्य:
१ कप उकडून कुस्करलेले बटाटे
१/२ कप ब्रेड क्रम्स
१ टेस्पून हिरवी मिरची, ठेचलेली
१/२ टीस्पून चाट मसाला
१/२ टीस्पून गरम मसाला
चवीपुरते मीठ
फ्रॅंकी रॅपसाठी
३/४ ते १ कप मैदा
१ टेस्पून तेल
चवीपुरते मीठ
पुरेसे पाणी पीठ मळण्यासाठी
इतर साहित्य:
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ टेस्पून व्हिनेगर
१ टीस्पून बारीक चिरलेली मिरची
२ ते ३ चिमटी मीठ
चाट मसाला चवीनुसार
कृती:
१) एका भांड्यात मैदा, तेल आणि मीठ घालून मिक्स करावे. पाणी घालून मध्यम असा गोळा भिजवावा. झाकण ठेवून १५ ते २० मिनिटे भिजू द्यावा.
२) एका वाडग्यात कुस्करलेले बटाटे, हिरवी मिरची, ब्रेड क्रम्स, चाट मसाला, गरम मसाला आणि मीठ घालावे. छान मळून त्याचे ६ सारखे भाग करावे. प्रत्येक भागाला कॅप्सुलसारखा लंबाकृती आकार द्यावा. सर्व साहित्य शिजलेले असल्याने रोल्सन शालो फ्राय करू शकतो. आवडत असल्यास डीप फ्रायसुद्धा करू शकतो. शालो फ्राय करणार असाल तर थोड्याथोड्या वेळाने रोल टर्न करावा म्हणजे सर्व बाजूंनी शेकला जाईल.
३) पिठाचा गोळा ६ भागात विभागून घ्यावा. एक गोळा घेउन पातळसर पोळी लाटावी. गरम तव्यावर थोडे तेल लावून शेकून घ्यावी, दुसरी बाजू शेकताना आच मंद ठेवावी.
४) रोल्स मायक्रोवेव्हमध्ये थोडे गरम करावे. गरम पोळी घेउन त्यावर गरम केलेला रोल ठेवावा. चाट मसाला भुरभुरावा, थोडी हिरवी मिरची, किंचित मीठ, कांदा आणि १/२ टीस्पून व्हिनेगर बटाट्याचा रोलवर घालावे. दोन्ही बाजू रोलवर आणून गुंडाळावे. गरमच सर्व्ह करावे.
अशाप्रकारे उरलेल्या फ्रॅंकीज बनवाव्यात.
टीप:
फ्रॅंकीसाठीची पोळी हि मैद्याचीच असावी. कणिक किंवा इतर पीठांपासून तयार केलेले रॅप्समुळे चवीत आणि टेक्स्चरमध्ये खूप फरक पडतो.

Hi, Vaidehi
ReplyDeletemast RCP aahe pan yamadhe maidya aivaji kanik vaparle tar chalel ka?
Aparna
टीप:
Deleteफ्रॅंकीसाठीची पोळी हि मैद्याचीच असावी. कणिक किंवा इतर पीठांपासून तयार केलेले रॅप्समुळे चवीत आणि टेक्स्चरमध्ये खूप फरक पडतो.
टीप:
Deleteफ्रॅंकीसाठीची पोळी हि मैद्याचीच असावी. कणिक किंवा इतर पीठांपासून तयार केलेले रॅप्समुळे चवीत आणि टेक्स्चरमध्ये खूप फरक पडतो.
बटाटा सारण पोळीत गुंडाळल्यावर पुन्हा फ़्राय करायचा नाही का तो रोल?
ReplyDeleteगरम पोळीवर मायक्रोवेव्ह मधून काढलेला रोल ठेवून कांदा, चाट मसाला, मीठ व्हिनेगर, आणि मिरच्या असे पेरून लगेच खायला द्यायचे.
ReplyDeleteएकदम जास्त गरम हवे असल्यास परत फ्राय करू शकतो.
Hi Aparna
ReplyDeletethank you
Nahi, kanakechya polyani chav changali lagnar nahi. Maidyachich poli vaparavi.
Tai,
ReplyDeletevinegar nai takla tar chalel ka???
namaskar Prasad
ReplyDeleteVinegar ha ya recipe madhala key ingredient ahe. tyamule chavit khup farak padato. Jar tumhala chalnar asel tar tumhi vinegar nahi takla tari chalel. Ambatpanasathi limbu vaparu shakta.
Tai,
ReplyDeletevinegar nhawta mhanun limbu takla hota
mast jhala hote frankies :)
khup recipes try kelya aahet me tujhya
saglya mast hotat :)
all the best :)
Tai,
ReplyDeletevinegar nhawta mhanun limbu takla hota
mast jhala hote frankies :)
khup recipes try kelya aahet me tujhya saglya mast hotat :)
all the best :)
Namaskar Prasad
ReplyDeleteKalavlyabaddal thanks!!
nice.........
ReplyDeletebread karmas mhanje nakki kay
ReplyDeleteब्रेड क्रम्ब्स म्हणजे ब्रेडचा चुरा. इतर रेसिपीमध्ये ड्राय ब्रेड क्रम्स वापरतात (वाळवलेल्या ब्रेडचा चुरा). पण वरील रेसिपीमध्ये साधा ब्रेड घेउन तो मिक्सरमध्ये बारीक करून वापरला तरीही चालेल.
ReplyDeletenice recipe....nice work!!!
ReplyDeletethanks for sharing it...
Thanks Padmashri
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteTumchy recipe khup easy ani chaan astat. Tumchi Potato franky chi recipe vachli chaan aahia. Mala paneer ani chees franky try karchi aahia. please paneer ani chees hi recipe share kar
Hello Deepali
DeleteComment sathi dhanyavad.
Me pudhe paneer sandwich chi recipe detey. Tyatil stuffing chi recipe vaparun tumhi Paneer Frankie banavu shakta. Fakt paneer che choukoni tukade na karta ubhya strips karavyat. - Paneer sandwich
Mi hi reciepe dinner sathi try keli. Khup chavisht hoti.. ekdum mumbai chi aathvan karun dili :D
ReplyDeletePotato Frankie just try kele.. agdi soppi ani quick dish. Tasted yummy...Mumbai chi aathvan jhali :D Thanks for sharing.
ReplyDeleteThanks Madhu :smile:
DeleteEk number nice 1 thank you sharing
ReplyDeleteThank you for sharing uttum banali frankie.....
ReplyDelete