बीन स्प्राऊटस सलाड - Beans Sprouts salad

bean Sprouts Salad in English वेळ: १५ मिनिटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: १०० ते सव्वाशे ग्राम बीन स्प्राऊटस ६ ते ८ काकडीच्या पातळ...

bean Sprouts Salad in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

Bean sprout salad, Salad recipes, chinese salad recipes, healthy salad, beans sprouts, bean sproutsसाहित्य:
१०० ते सव्वाशे ग्राम बीन स्प्राऊटस
६ ते ८ काकडीच्या पातळ चकत्या (काकडी सोलून घ्यावी. अर्धगोलाकार चकत्या कराव्या)
१/२ टीस्पून आलं, पातळ चकत्या
१ पाती कांदा, बारीक चिरून
१ लहान गाजर, मोठ्या भोकाच्या किसणीवर किसून घ्यावे
१ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१ टेस्पून तीळ, हलकेच भाजून
१/२ लिंबाचा रस१ टीस्पून सॉय सॉस
१ हिरवी मिरची, बारीक चिरून (ऐच्छिक)

कृती:
१) कढल्यात १ टेस्पून तेल गरम करून त्यात आलं कुरकुरीत करून घ्यावे. चमच्याने काढून ठेवावे. तेल सुद्धा एका वाटीत काढावे.
२) मोठ्या बोलमध्ये स्प्राऊटस, काकडी, पाती कांदा, गाजर, कोथिंबीर, आणि हिरवी मिरची एकत्र करावी. लिंबाचा रस, उरलेले तेल, सॉय सॉस आणि आलं घालून मिक्स करावे. तीळ घालून सजवावे. लगेच खावे.
टीपा:
१) स्प्राउट्स खूप नाजूक असतात. त्यामुळे जास्त वेळ मिक्स करू नये, मउसर होतात.

Related

Salad 4090053973326203957

Post a Comment Default Comments

  1. He bean sprouts kuthalya beans che asatat? Mugache vatat nahi.

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item