काकडीचा कायरस - Kakdicha Kayras

Kakdi Kayras in English वेळ: १० ते १५ मिनिटे वाढणी: ३ ते ४ जणांसाठी साहित्य: १ कप बारीक चिरलेली काकडी (सोलून) १ टेस्पून चिंचेचा घट्ट ...

Kakdi Kayras in English

वेळ: १० ते १५ मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

cucumber salad, kakdicha kayras, kakdichi koshimbiसाहित्य:
१ कप बारीक चिरलेली काकडी (सोलून)
१ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ
३ ते ४ टेस्पून किसलेला गूळ किंवा चवीनुसार
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट (थोडा भरडसर)
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/८ टिस्पून जिरे, २ चिमटी हिंग, १/८ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मिठ

कृती:
१) चिंचेचा कोळ एका मध्यम वाडग्यात घ्यावा. त्यात साधारण १/२ कप पाणी घालून मिक्स करावे. मिठ, गूळ घालून गूळ विरघळेस्तोवर मिक्स करावे. (पाण्याची चव आंबटगोड असली पाहिजे, त्यानुसार चिंच किंवा गूळ आवडीनुसार वाढवावा)
२) चिंचेच्या पाण्यात काकडी घालावी. मिश्रण पातळसरच असावे, तेव्हा लागल्यास अजून थोडे पाणी घालावे. दाण्याचा कूटही घालावा.
३) कढल्यात तेल गरम करावे. जिरे, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. हि फोडणी कायरसावर घालावी. कोथिंबीर घालून मिक्स करावे.
काकडी कायरस जेवणात तोंडीलावणी म्हणून घ्यावे.

टीप:
१) आवडीनुसार चिंचेचा कोळ किंवा गूळ कमी जास्त करू शकतो.

Related

Marathi 1026388525469889615

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item