लिंबाचे टिकाऊ सरबत - Limbu sarbat Recipe | चकली

लिंबाचे टिकाऊ सरबत - Limbu sarbat

| , , , , | 23 comments »

Lemon Juice in English


वेळ: साधारण २५ मिनीटे
साधारण ३ कप लिंबाचे टिकाऊ सरबत (यातून साधारण २०-२२ जणांना लिंबाचे सरबत बनू शकेल)

homemade lemonade, limbache sarbat, gharguti limbache sarbat, summer drink, limbu sarbatसाहित्य:
१ कप लिंबाचा रस (साधारण १२ मोठी रसाची लिंबं)
अडीच कप साखर
३/४ कप पाणी
२ टिस्पून मिठ

कृती:
१) लिंबाचा रस गाळून घ्यावा म्हणजे बिया आणि लिंबाचा किंचीत राहिलेला गर निघून फक्त लिंबाचा रस उरेल.
२) अडीच कप साखर आणि ३/४ कप पाणी एका पातेल्यात एकत्र करावे. गोळीबंद पाक करावा (महत्त्वाची टिप).
३) पाक तयार झाला कि गॅस बंद करावा. तयार पाकात लिंबाचा रस घालून ५ मिनीटे ढवळावे. नंतर जरा निवेस्तोवर अधूनमधून ढवळावे.
४) तयार लिंबू सरबत काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवावा.
लिंबाचे सरबत करताना १ ग्लासभर लिंबाचे सरबत बनवायचे असल्यास, एका ग्लासमध्ये २ मोठे चमचे लिंबाचा पाक घालावा, गार पाणी घालावे आणि मिक्स करावे. मिठाची गरज लागल्यास किंचीत मिठ घालावे. तसेच बर्फही घालू शकतो.

टीप:
१) लिंबाच्या सरबतात चिमूटभर वेलचीपूड घातली तरी छान फ्लेवर येतो.
२) गोळीबंद पाक म्हणजे पाकाचा थेंब गार पाण्यात टाकल्यावर टणक गोळी तयार झाला पाहिजे. पण लिंबू सरबताला मऊसर गोळी (Soft Ball Consistency) तयार झाली तरीही चालेल.

Labels:
Lemon Juice, Homemade Lemonade, limbu sarbat

Email this recipe to friends and family!
 
AddThis Social Bookmark Button
Print Friendly and PDF

23 comments

  1. मोगरा फुलला // November 18, 2010 9:52 AM  

    वा! छान रेसिपी सांगितलीत.

  2. gayatri // November 19, 2010 1:25 AM  

    majhi aai he sarbat karaychi
    just she used to add saindhav meeth or kala namak in to it

  3. मोगरा फुलला // November 19, 2010 2:37 AM  

    हे कॉन्सन्ट्रेट सरबत फ्रिजमधे किती दिवस टिकू शकेल?

  4. Vaidehi // November 19, 2010 6:29 PM  

    धन्यवाद कांचनताई, गायत्री

    गायत्री: चांगली आयडीया आहे..

    कांचन ताई: हे सरबत concentrate फ्रिजमध्ये ३-४ महिने सहज टिकते.

  5. मोगरा फुलला // November 21, 2010 11:54 PM  

    ३ ते ४ महिने टिकतं! मग तर बरंच झालं. ऐनवेळेस सर्व्ह करण्यासाठी चांगलं घरगुती सरबत मिळालं. या माहितीसाठी खूप आभार वैदेही.

  6. Vaidehi // November 22, 2010 9:00 AM  

    dhanyavad

  7. मोगरा फुलला // December 1, 2010 4:12 AM  

    वैदेही,

    लिंबू सरबत बनवले. छानच झाले आहे. या रेसिपीसाठी पुन्हा एकदा आभार.
    अशाच प्रकारे कोकम सरबत कॉन्सन्ट्रेटची रेसिपी देऊ शकाल का?

  8. Vaidehi // December 1, 2010 8:13 AM  

    नमस्कार कांचन,

    लिंबू सरबत बनवलेत आणि आठवणीने कमेंट पोस्ट केलीत त्याबद्दल धन्यवाद
    कोकमाचे सरबत जनरली रातांब्याच्या (कोकम फळ) आतील गरापासून बनवतात, पण जर शक्य असेल तर मी सुकवलेल्या कोकमापासून बनवून पाहिन, पाककृती निट जमली तर नक्की पोस्ट करेन.

  9. Suvarna // December 2, 2010 1:06 AM  

    chhan! gharat nemaki khoop limb ali ani hi recipe milali. thanks alot

  10. Vaidehi // December 3, 2010 2:11 PM  

    thanks suvarna

  11. कांचन कराई // December 5, 2010 7:39 AM  

    वैदेही, रातांब्यांचे कोकम सरबत जरा वेळखाऊ काम आहे ;-) म्हणजे, साखर आणि गराचे लेयर्स दादरा बांधून ठेवायचे इ. तसं हल्लीच्या घरांमधे जागेच्या अपुरेपणामुळे करता येत नाही. शिवाय शुचिताही बाळगावी लागते. जर सुक्या कोकमांच्या सिरपची पाकृ देता आली तर खूप बरं होईल. धन्यवाद.

    सजेशन्समधे एक कमेंट लिहिते आहे.

  12. Vaidehi // December 5, 2010 7:30 PM  

    कांचन
    बरोबर आहे आणि इथे अमेरीकेत कुठे मिळायचे रातांबे :) मी ट्राय करून पाहिन सुक्या कोकमापासून, चांगली कल्पना आहे.

  13. Deepak Kale // December 8, 2010 10:27 AM  

    Nice Recipe ,,,Thanks

  14. Vaidehi // December 9, 2010 10:02 AM  

    dhanyavad deepak

  15. Minakshi // February 20, 2011 3:55 AM  

    छान आहे रेसीपी...ह्या सरबतासारखे संत्र्याचे पण सरबत करता येइल का?

  16. Vaidehi // February 21, 2011 10:29 PM  

    नमस्कार मिनाक्षी

    संत्र्याचे सरबत नक्की पोस्ट करेन.

  17. aparna // April 18, 2011 1:28 AM  

    धन्यवाद
    बाजारात महागडी सिरप घेण्यापेक्षा हे खूप चांगल आहे.

    Aparna, Pune.

  18. Vaidehi // April 18, 2011 10:58 AM  

    heloo अपर्णा
    नक्कीच, आणि चवीलाही खुप छान लागते.

  19. Anonymous // September 4, 2011 4:34 AM  

    hello vaidehi , khup chagale recipes aahet .

  20. Vaidehi // September 6, 2011 10:47 PM  

    thanks

  21. Anonymous // November 30, 2011 7:53 PM  

    thanks!!! nice recepie
    alka

  22. Anonymous // December 7, 2011 5:26 AM  

    khup chaan thank you

  23. Vaidehi // December 7, 2011 11:22 PM  

    thanks

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting Chakali.Your comments are truly valuable!

Please feel free to share your ideas, suggestion, criticism, feedback for my recipes. You can also request a recipe. I'll try to answer you as soon as possible.

If you want to write to me personally, email me at chakalionline@gmail.com.



Add it to your iGoogle Page