सफरचंद डाळींब रायता - Apple Pomegranate Raita

Apple Pomegranate Raita in English ४ ते ६ जणांसाठी वेळ: १० ते १५ मिनीटे साहित्य: १ कप डाळींबाचे दाणे १ कप बारीक चिरलेले लाल सफरचंद (ट...

Apple Pomegranate Raita in English

४ ते ६ जणांसाठी
वेळ: १० ते १५ मिनीटे

साहित्य:
१ कप डाळींबाचे दाणे
१ कप बारीक चिरलेले लाल सफरचंद (टीप)
१/२ कप दही
१ टेस्पून दूध
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
१ टिस्पून साखर
१ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मिठ

कृती:
१) दही आणि दूध एकत्र घोटून घ्यावे. लागल्यास एखादा चमचा दूध घालावे. यामध्ये बारीक चिरलेले सफरचंद घालून मिक्स करावे.
२) आता डाळींबाचे दाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, साखर आणि मिठ घालून व्यवस्थित मिक्स करावे. तासभर फ्रिजमध्ये गार करावे. जेवणामध्ये तोंडीलावणी म्हणून सर्व्ह करावे.

टीप:
१) सफरचंद आधीच कापून ठेवू नये, काळे पडते. दही घोटल्यावर मग सफरचंद चिरायला घ्यावे आणि थोडे चिरून झाले कि दह्यात घालावे, म्हणजे सफरचंद काळे पडणार नाही.

Related

Raita 75247070647264477

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item