लेमन राईस - Lemon Rice Recipe | चकली

लेमन राईस - Lemon Rice

| , , , , | 4 comments »

Lemon Rice in English

२ जणांसाठी
वेळ: १० मिनीटे

lemon rice, South Indian lemon rice recipeसाहित्य:
अडीच कप शिजलेला मोकळा भात (शिळा भात चालेल)
२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
१/८ ते १/४ टिस्पून हिंग
१/२ टिस्पून किसलेले आले
४ ते ६ कढीपत्ता पाने
मूठभर शेंगदाणे
१/२ टिस्पून उडीद डाळ
३ लाल सुक्या मिरच्या, तोडून
दिड टेस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
कोथिंबीर, बारीक चिरून

कृती:
१) भात हाताने मोकळा करून घ्यावा. त्यात मिठ आणि लिंबाचा रस घालून हलक्या हाताने मिक्स करावे. शितं अख्खी राहू द्यावीत.
२) कढईत तूप गरम करावे, त्यात शेंगदाणे ब्राऊन होईस्तोवर परतावे. शेंगदाणे परतले कि त्यात जिरे, हिंग, आले, कढीपत्ता, उडीद डाळ, लाल मिरच्या घालून परतावे आणि भात फोडणीस घालावा. व्यवस्थित परतावे. कोथिंबीर पेरून गरमा गरम सर्व्ह करावे.

टीप:
१) जर ताज्या भाताचा लेमन राईस बनवायचा असेल तर भात मोकळा शिजवावा आणि मोठ्या ताटात पसरवावा, थोडा गार झाला कि अर्धा तासभर फ्रिजमध्ये ठेवावे आणि नंतर फोडणीस घालावा.
२) उरलेल्या भातापासून फोडणीभात, टॅमरिंड राईस करता येतो, तसेच इतर भाताचे प्रकार इथे पाहा.
Label:
Lemon Rice, South Indian lemon rice recipe

Email this recipe to friends and family!
 

AddThis Social Bookmark Button

4 comments

  1. HAREKRISHNAJI // August 6, 2009 3:01 AM  

    "त्याव्यतिरिक्‍त गूगलवर "मराठी पदार्थ" असा सर्च केलात तर चकली, वदनी कवळ घेता, असे मस्त नवनवीन मराठमोळ्या पदार्थांच्या रेसिपीज असलेले ब्लॉगस सापडतील. www.chakali.blogspot.com वर तर अस्सल खेकडाभजी, बटाटाभजीपासून कोथींबीरवडीपर्यंत चटकदार रेसिपीजची माहीती मिळते "

    हे वर्णन आहे सकाळ ग्रुपच्या " तनिष्का " मासिकातले, ऑगस्ट २००९ "

    असेच लिहित जा, सातत्याने, उत्तोमोत्तम .

  2. Vaidehi // August 6, 2009 8:23 AM  

    नमस्कार हरेकृष्णजी,
    खुप खुप आभार ही छान बातमी मला दिल्याबद्दल!! मागेसुद्धा पेपरमध्ये आलेली बातमी तुम्हीच दिली होतीत.. आणि तुमच्या शुभेच्छांसाठी खरंच खुप धन्यवाद..

  3. sanjivani // August 7, 2009 9:52 AM  

    masta ahe hi recipe!!

    Recipe calendar..
    ani weekend recipes chya suggestions..
    wa..wa masta ch idea ahe hi!
    your blog rocks.. :)
    Keep it up!

  4. Vaidehi // August 7, 2009 10:02 AM  

    धन्यवाद संजिवनी कमेंटसाठी

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting Chakali.Your comments are truly valuable!

Please feel free to share your ideas, suggestion, criticism, feedback for my recipes. You can also request a recipe. I'll try to answer you as soon as possible.

If you want to write to me personally, email me at chakalionline@gmail.com.