टॅमरिंड राईस - Tamarind Rice

Tamarind Rice साहित्य: सव्वा कप वाटी तांदूळ पाउण कप चिंचेचा कोळ ३-४ भरल्या सांडगी मिरच्या २ लाल सुक्या मिरच्या २ टिस्पून लाल तिखट १...

Tamarind Rice

imarli rice, tamarind rice, chinchecha bhat, imali bhat
साहित्य:
सव्वा कप वाटी तांदूळ
पाउण कप चिंचेचा कोळ
३-४ भरल्या सांडगी मिरच्या
२ लाल सुक्या मिरच्या
२ टिस्पून लाल तिखट
१ टेस्पून उडीद डाळ
पाव कप शेंगदाणे
फोडणीसाठी: २ चमचे तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे,१/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद, ३-४ कढीपत्ता पाने
मीठ

कृती:
१) सर्वप्रथम सव्वा वाटी तांदूळाचा फडफडीत भात शिजवून घ्यावा. भात थंड होवू द्यावा. भात थंड झाला कि त्याला चवीपुरते मिठ आणि लाल तिखट लावून मिक्स करावे.
२) कढईत तेल गरम करावे, मोहोरी, जिरे, हिंग, हळद कढीपत्ता घालावी. लाल मिरच्यांचे तुकडे करून घालाव्या. सांडगी मिरच्या घालून ढवळावे. शेंगदाणे आणि उडीद डाळ घालून परतावे. उडीद डाळ गोल्डन ब्राउन झाली कि चिंचेचा कोळ घालावा. १५-२० सेकंदाने भात घालून ढवळावे. २ मिनीटे वाफ काढावी.

Labels:
Tamarind Rice, South Indian Rice, Indian Spicy Rice, Tamarind Rice recipe, Chinchecha bhat, Imali Rice, Imli Rice

Related

Travel 8289072042578011765

Post a Comment Default Comments

  1. Namaskar,

    Tumcha blog khup chan aahe.Mi swayampak karane shikat aslyane mala hyachi khup madat hot aahe.

    mala ha taramind rice cha prakar karavayacha aahe.Pan yat sangitlya pramane sandgi mirchi la dusra kahi paryay nahi ka?

    Mi pardeshat aslyane sagli samagri milne jara avghad aahe.Mi aaplya uttarachi wat pahil.

    Sheetal

    ReplyDelete
  2. नमस्कार शीतल,
    कमेंटसाठी धन्यवाद, सांडगी मिरच्यांना तसा पर्याय नाही, पण तुमच्या जवळच्या इंडीयन स्टोअरमध्ये पापडाच्या सेक्शनमध्ये बहुदा मिळतील. सांडगी मिरच्या म्हणजे जाड मिरच्यांमध्ये मसाला भरून उन्हात खडखडीत सुकवलेल्या असतात त्यामुळे त्यांचा रंग पांढरट-करडा असा असतो. या मिरच्या तळून आमटीभाताबरोबरसुद्धा तोंडीलावायला छान लागतात.
    अजून एक आयडीया!! - १/२ टीस्पून मोहोरी, १/२ टिस्पून मेथीदाणे, १ टीस्पून धणे असे मंद आचेवर गुलाबीसर भाजून त्याची बारीक पूड करावी. आणि या पावडर मधील ’फक्त १/२ टिस्पूनच’ पावडर चिंचकोळात मिसळून भातामध्ये घालावी. भाताला छान स्वाद येईल.

    ReplyDelete
  3. Also while frying ground nut, you can add cashew (optional), chana dal and ginger paste (must). Actual Tamrind rice sandagi mirchi is not used.

    ReplyDelete
  4. This rice we can take while travelling. Ani ha bath don -tin divas chan rahato,without fridge.
    All your reciepies are good and keep it up. Actually now I was preparing tamrind rice, so added tips in your method. and daily I am referring your blog to scoll the recipies.

    ReplyDelete
  5. sandgi mirchya evaji curd chilli vaprali tar?karan ethe sandagi mirchya nahi bhetat.......

    ReplyDelete
  6. Sandgi mirchya nahi vaparlya tari chalel mag avadipramane tikhatpanasathi sadhya mirachya vaparavyat.

    ReplyDelete
  7. उडीद डाळ bhijvaleli ghyachi ki kachich ghyachi

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item