मेथांबा - Methamba

Methamba in English साधारण १/४ ते १/२ कप मेथांबा वेळ: साधारण ३० मिनीटे Health Tip : Health benefits of Methi (Fenugreek) Seeds साहित...

Methamba in English

साधारण १/४ ते १/२ कप मेथांबा
वेळ: साधारण ३० मिनीटे

methamba, mango chutney, sweet mango relish
साहित्य:
१ कप सोललेल्या कैरीचे लहान तुकडे
१/२ कप गूळ
१/२ टिस्पून मेथी दाणे
१ टिस्पून तेल
१/८ टिस्पून मोहोरी
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून लाल तिखट, किंवा चवीनुसार
चवीपुरते मिठ

कृती:
१) लहान पातेल्यात तेल गरम करावे, मेथी दाणे घालून परतावे. मेथीदाणे परतले गेले कि त्यात मोहोरी, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. लगेच कैरीच्या फोडी घालून मंद आचेवर कैरी नरम होईस्तोवर वाफ काढावी. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे. चवीपुरते मिठ घालावे.
२) कैरीच्या फोडी शिजल्या कि त्यात गूळ आणि थोडे पाणी घालावे. मंद आचेवर मिश्रण घट्टसर होईस्तोवर शिजू द्यावे. पाक आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवावा.

Labels:
Mango relish, Methamba

Related

Pickle / Preserve 4283036188100729120

Post a Comment Default Comments

  1. HI vaidehi,
    Ha methamba kiti diwas tikato? ani fridge madhe nahi thevla tari chalato ka?

    ReplyDelete
  2. Prachi

    Hi Vaidehi Mam
    mala hapus ambyacha sakhar amba recipe post karal ka?

    ReplyDelete
    Replies
    1. http://chakali.blogspot.in/2012/08/moramba.html

      Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item