पुरी - Puri
Puri in English साधारण १५ ते २० मध्यम पुर्या साहित्य: १ कप गव्हाचे पिठ १ टेस्पून बेसन पिठ १ टेस्पून रवा १/२ टिस्पून मिठ किंवा चवीन...
https://chakali.blogspot.com/2009/03/purya-shrikhand-puri.html
Puri in English
साधारण १५ ते २० मध्यम पुर्या
साहित्य:
१ कप गव्हाचे पिठ
१ टेस्पून बेसन पिठ
१ टेस्पून रवा
१/२ टिस्पून मिठ किंवा चवीनुसार
१ टेस्पून तेल
तेल तळणीसाठी
ओला, पिळून घेतलेला कपडा, मळलेला गोळा झाकण्यासाठी
कृती:
१) एका वाडग्यात गव्हाचे पिठ, बेसन पिठ, रवा, आणि मिठ एकत्र मिक्स करावे. कढल्यात १ टेस्पून तेल गरम करून, गरम तेलाचे मोहन मिक्स केलेल्या पिठांत घालावे. दोन मिनीटे थांबावे.
२) मिसळलेल्या पिठात पाणी घालून मध्यमसर मळून घ्यावे. १० मिनीटे मळलेली कणिक झाकून ठेवावी.
३) १० मिनीटांनी परत एकदा भिजवलेली कणिक मळून घ्यावी. नंतर कणकेचे २ सेमीचे एकसारखे गोळे करून घ्यावे. तुमच्या आवडीनुसार मोठे गोळे करून मोठ्या पुर्यासुद्धा करता येतील, पण फक्त गोळे एकसारखे करा म्हणजे पुर्यांचा आकार एकसारखा येईल.
४) तेल तापत ठेवावे. त्यावेळात पुर्या लाटाव्यात. जमतील तेवढ्या पुर्या लाटून त्यावर ओला कपडा ठेवावा म्हणजे पुर्या सुकणार नाहीत. पुर्या खुप जाड किंवा पातळ नसाव्यात. जाडी साधारण १ mm असावी. पुर्या लाटून सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
Labels:
Puri, Shrikhand Puri, Poori bhaji

वा ! पुरी एकदम टम्म फुगली आहे, गुडी पाडव्यासाठी साठी मस्त बेत आहे !
ReplyDeleteDhanyavad Commentsathi :)
ReplyDeleteGive More Maharashtrian Recipies!
ReplyDeleteVaidehi,
ReplyDeleteMala adhi puri banawnyacha ewdha confidence navta pan mala tumchya recipes war purna confidence ahe :) karan mi tumchya recipepramane kelele sarwa padartha chhanach hotat. Tar yaweli mi mazhya vadhdiwsachya diwshi tumchya recipepramane Purya try kelya ani tya khupach sundar zalya! Mazhya navryala purya khupach aawdtat ani tyalahi ya purya khupach aawdlya. Taste ani ranghi khupach chhan! Ata mala kadhihi puri banwaycha problem kinwa tension yenar nahi :) thanks to you!
Swati
Hi स्वाती,
ReplyDeleteBelated Happy Birthday..kharach khup barr vatle ki indirectly ka hoina mazyatarfe Poorichi recipe tumhala gift mhanun milali.. :) ani tumhi lagech comment taklit tyabaddal khup dhanyavad...
तुमच्या रेसिपी समजण्यासाठी खुपच सोप्प्या आहेत.
ReplyDeleteअगदी आईची आठ्वण आली, जश्याकाही तिनेच ह्या मला पाठविल्या आहेत
धन्यवाद,
Thanks commentsathi :)
ReplyDeleteDear Vaidehi,
ReplyDeleteTumhi dashmyanchi receipe post karal ka??? mi vat pahil.
Sheetal
शितल,
ReplyDeleteनक्की प्रयत्न करेन दशमीची रेसिपी पोस्ट करण्याचा..
party sathi puri banaychi asel tar kiti adhi banvun thevavi mahnje garam server karta yeil
ReplyDeleteadhi sarv bakiche padarth tayar thevave ani nantar sadharan ek tasbhar adhi puri banavavi.
ReplyDeletehi, i jst luv al recipies ............
ReplyDeletethanks pradnya
ReplyDeleteHi, Vaidehi
ReplyDeleteMala tumacha receipes aawadtat. khup sopya asatat.
Puri sathi aanakhi ek chhoti tip dyavishi watat aahe 1 tsp. sakhar takalyane chav khup chhan yete.
namaskar
ReplyDeletetip sathi dhanyavad
Hi
ReplyDeleteMe purya kelya pan tya duglya nahi agadi flat ch rahilya kay karan asave.Ni ho ourys mand achevar talavyat ki mothya.mothya achevar tya lagech soneri disayala laglya..
Hi Priya
ReplyDeletePurya madhyam achevar talavyat. kami achevar talalya tar telkat hotat ani fugatahi nahit.
tasech kanik jar sail malali asel tari purya fugat nahit.
मस्त..
ReplyDeleteBest recipe
ReplyDeleteUr recipes r always full proof hit. Keep the good work of posting new recipes on ur blog.
ReplyDelete