क्रिस्पी भेंडी - Crispy Bhendi
Crispy Bhendi in English वाढणी: १ प्लेट (२ जणांसाठी) साहित्य: १५ भेंडी, मध्यम आकाराच्या २ टेस्पून बेसन १ टेस्पून तांदूळ पिठ १/२ टिस...
https://chakali.blogspot.com/2009/03/crispy-okra.html
Crispy Bhendi in English
वाढणी: १ प्लेट (२ जणांसाठी)
साहित्य:
१५ भेंडी, मध्यम आकाराच्या
२ टेस्पून बेसन
१ टेस्पून तांदूळ पिठ
१/२ टिस्पून आलेलसूण पेस्ट
१ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
१/४ टिस्पून जिरेपूड
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल (टीप १)
चवीनुसार चाट मसाला
कृती:
१) भेंडी धुवून घ्यावी. व्यवस्थित पुसून देठं कापून घ्यावीत. प्रत्येक भेंडीचे एकदम पातळ उभे काप काढावेत.
२) एका छोट्या वाटीत बेसन, तांदूळ पिठ, लाल तिखट, हळद, जिरेपूड, थोडा चाट मसाला आणि चवीपुरते मिठ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करावे. भेंडीचे पातळ काप एका वाडग्यात घ्यावेत व त्यात आलेलसूण पेस्ट घालून चमच्याने ढवळावे. त्यात बेसन पिठाचे मिश्रण घालून हलक्या हाताने मिक्स करावे. हे मिश्रण १५ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कढईत तेल गरम करावे. भेंडीचे मॅरीनेटेड पातळ काप तेलात सुटे करून सोडावेत. मिडीयम हाय गॅसवर कुरकूरीत होईस्तोवर तळावेत. शक्यतो ३ ते ४ बॅचमध्ये भेंडी तळावी. तळलेले भेंडी काप पेपर टॉवेलवर काढून घ्यावेत. यावर थोडे लिंबू पिळावे किंवा चाटमसाला घालावा. तिखटपणासाठी लाल तिखट भुरभूरवावे.
हि क्रिस्पी भेंडी स्टार्टर म्हणून छान लागते.
टीप:
१) भेंडीसाठीचे कोटींग सुके असल्याने तळताना ते तेलात उतरते त्यामूळे तेल कमीच घ्यावे आणि ३ ते ४ बॅचमध्ये भेंडी तळावी.
२) क्रिस्पी भेंडी बनवताना पाणी वापरू नये. अगदीच गरज पडल्यास चमचाभर पाणी घालावे. जास्त पाणी घातल्यास बाहेरचे आवरण कुरकूरीत होणार नाही.
Labels:
Crispy Bhindi, Kurkuri Bhendi, Fried Okra

Hi!
ReplyDeleteI just made this and it was really tasty.
The only thing I didnt have is rice flour and I had nothing comparable to substitute it (any substitutes for rice flour), so I went ahead w/o it and as a result the mixture was very sticky and couldnt isolate single bindi-chop at a time... nevertheless the fried version was very tasty AND crispy too.. :)
Thanks for the recipe..
Pradnya
bhendi thodi bulbulit asate na karan normal bhaji karatana aapan kokam takto mag ase kelya var bulbulit nahi lagnar ka
ReplyDeletenahi ajibat nahi rahat bulbulit.. ekdum chan kurkurit lagte..
ReplyDeleteएकदम मस्त आहे ही क्रिस्पी भेंडी ……।
ReplyDeleteSo nice...
ReplyDeleteमस्त आहे हि रेसिपि.. आज केली होती... झकास झाली...धन्यवाद वैदेही
ReplyDeletedhanyavad Darshana
Delete