आलू मुंगोडी चाट - Aloo Mungodi chat
Aloo Mungodi Chat in English वाढणी: २ ते ३ जणांसाठी वेळ: ४० मिनीटे (मूग भिजलेले असल्यास) साहित्य: मुगभजीसाठी::: १/२ कप हिरवी मुगडाळ (...
https://chakali.blogspot.com/2008/11/aloo-mungodi-chat-pakoda-chat.html
Aloo Mungodi Chat in English
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: ४० मिनीटे (मूग भिजलेले असल्यास)
साहित्य:
मुगभजीसाठी:::
१/२ कप हिरवी मुगडाळ (सालासकट)
३-४ हिरव्या मिरच्या, ४ लसूण पाकळ्या
१/२ टिस्पून लाल तिखट, १/२ टिस्पून हळद, १ टिस्पून जिरेपूड
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल
बटाटा:::
२ मध्यम बटाटे, उकडून, १ टिस्पून बटर, चवीपुरते मिठ, १ टिस्पून लिंबाचा रस
लाल चटणी:::
लाल मिरच्या भिजवण्यासाठी वेळ नव्हता म्हणून मी लाल चटणी पुढील प्रमाणे केली
२ टिस्पून काश्मिरी लाल तिखट, १ टिस्पून धणेपूड, २-३ टेस्पून पाणी
इतर साहित्य:::
२ टेस्पून हिरवी चटणी
१/४ कप चिंचेची चटणी
२ टिस्पून चाट मसाला
१ टिस्पून जिरेपूड
१/२ कप दही
१/२ टिस्पून काळे मिठ
साधे मिठ चवीनुसार
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १/४ कप बारीक शेव, १/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ टिस्पून लाल तिखट
कृती:
१) चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी तयार ठेवावी. दही फेटून घ्यावे.
२) मुगभजीसाठी हिरवी मुगडाळ ३ तास भिजत घालावी. त्यातील पाणी काढून टाकावे. मिक्सरमध्ये भिजवलेली हिरवी मुगडाळ, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, लाल तिखट, हळद, जिरेपूड, चवीपुरते मिठ घालून बारीक करावे. तेल गरम करून त्यात छोट्या भजी तळून घ्याव्यात.
३) उकडलेले बटाटे सोलून त्याचे छोटे तुकडे करून घ्यावेत. एक पॅन गरम करून बटर घालावे त्यात बटाट्याच्या फोडी घालून परतावे. गॅस मध्यम ठेवावा. मिठ घालावे आणि गॅस बंद करून लिंबाचा रस घालावा.
४) प्लेटमध्ये आधी भज्या घालाव्यात त्यावर परतलेले बटाटे, २ चमचे दही, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, लाल चटणी, अजून थोडे दही, चाट मसाला, जिरेपूड, काळे मिठ, साधे मिठ, लाल तिखट घालावे. शेवटी कोथिंबीर, बारीक शेव घालून सजवावे.
Labels:
Dahi Chat, Pakoda Chat, Moong Bhajji Chat, Bombay chat food, Aloo Chat

vaa pharach chhaan recipe!!1
ReplyDeletedhanyavad !!
ReplyDeleteMala 10 jannasathi appetizer mhanun he chaat karayachi aahe. Sadharan kiti mung daal gheu? salasakat aivaji Sadhi mung daal ghetli tar chalel ka?
ReplyDeleteनमस्कार,
ReplyDeleteमी जेव्हा १/२ कप डाळीची बनवली होती तेव्हा २ ते ३ जणांना appetizer म्हणून पुरेशी झाली होती. ८ ते १० जणांना साधारण २ कप लागेल.
माझ्या मते हिरवी मूगडाळ जास्त छान लागेल कारण मी पिवळी मूगडाळ चाटमध्ये वापरली नाहीये तरीही तिच्या दोन्ही भज्यांच्या चवीवरून हिरवी सालासकटची डाळ जास्त चविष्ट लागते हे नक्की. पिवळी वापरलीत तरी हरकत नाही पण मी हिरवी डाळ सजेस्ट करेन :)
धन्यवाद
mee kaalach hi chaat banavli hoti. party madhe saglyanna pharach aavadli. Thanks a lot for this recipe!!
ReplyDeletethanks for your feedback
ReplyDeleteI m glad that your guests enjoyed this dish..
Mmmmm....!!
ReplyDeletekhupcha mast ahe hi recipe me nakich karun pahil
ReplyDeletedhanyavad
ReplyDeleteMALA KHUPCHA AVADLI HI RECEPI MALA TUMCHI HI WEBSIDE KHUP AVADTE KADHI KAHI ADCHAN ALI TAR ME LAGECHA HI WEBSIDE OPEN KATE
ReplyDeletePRACHI
Dhanyavad
Delete