उपवासाचे घावन - Upavasache Ghavan

Upavasache Ghavan ( English Version ) साहित्य: १ वाटी वरी तांदूळ १ वाटी साबुदाणे २ हिरव्या मिरच्या २ चमचे नारळाचा चव २ चमचे दाण्याच...

Upavasache Ghavan (English Version)

healthy recipes, dinner recipe, healthy food recipes, easy recipes, fast food, low fat recipes, diet food, snack recipes, breakfast recipes, heart healthy food, reduce body fat, healthy recipes for kids, food list, whole foods diet, easy low fat recipes, salad recipes, how to reduce fat, health food center, low fat fast food, fasting, fast food, sago, vari tandul

साहित्य:
१ वाटी वरी तांदूळ
१ वाटी साबुदाणे
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे नारळाचा चव
२ चमचे दाण्याचे कूट
१ चमचा जिरे
चवीपुरते मिठ
साजूक तूप

कृती:
१) साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे.
२) दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे.
३) नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी बाजू निट होवू द्यावी.
गरम गरम घावन नारळाच्या चटणी सर्व्ह करावे.

टीप:
१) कधी कधी साबुदाणा चिकट असला तर वाफ काढल्याने घावन गदगदलेले होते आणि घावन कालथ्याने उलथायला सुद्धा त्रास होतो. म्हणून पहिल्या घावनाला वाफ काढून पाहावी. जर घावन चिकट होत असेल तर वाफ न काढता मध्यम आचेवर दोन्ही बाजू निट भाजून घ्याव्यात.
२) घावनात थोडीशी चिरलेली कोथिंबीर सुद्धा छान लागते.
3) मिरची आवडीनुसार कमीजास्त वापरावी.

चकली

Labels:
Fasting Recipes, Sabudana Ghavan, Sago Recipes, Fasting meal, Fasting food. Vari Tandul recipe, sabudana recipe

Related

Snack 1281219200410525829

Post a Comment Default Comments

  1. घावन काळ्या वाटण्याच्या उसळीबरोबर काय मस्त लागतात.

    आता या उपवासाच्या घावनासाठी तरी उपवास करावा लागणारस दिसत.

    ReplyDelete
  2. Harekrishnaji,

    धन्यवाद कमेंटसाठी,
    आणि हो! उपवास नक्की करा .. घावनासाठी !! :)
    वरीतांदूळ आणि साबुदाणा Combination एकदम झक्कं लागते. :)

    ReplyDelete
  3. चकली तुझया सगळ्याच पाककृती सोप्प्या आणि मुद्देसूद असतात. अगदी सुरुवातीपासून मी पंखा आहे तुझ्या ब्लॉगचा आणि ज्या प्रकारे तू इथे योजनाबदध रीतीने पाककृती मांडल्या आहेस त्याचाही :-)
    ह्या उपवासाच्या पदार्थात तू तेल वापरा म्हणत आहेस, उपासाला शक्यतो तेल वापरत नाहीत, तूप वापरतात, सुधारणा करता येईल का तुला वरच्या माहिती मध्ये? उपास करणार्यांच्या जिभेचा आणि भावनेचा प्रश्न आहे :-)
    तुझ्या पाकनैपुण्याचा आम्हा सगळ्यांना असाच फायदा मिळत राहो.
    - उपास (मायबोली )

    ReplyDelete
  4. नमस्कार प्रशांत,
    तुमच्या कमेंटसाठी आभार
    तुम्ही सांगितल्याप्रमाणे दुरूस्ती केली आहे. अगदी बरोबर सुचवलेत.
    तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
    चकली

    ReplyDelete
  5. मी उपवास नेहमी करते पण त्यात नेहमीच्याच पदार्थांचा समावेश असतो. (साबुदाणा, चिप्स) या वेगळ्या प्रकाराने माझ्या उपवासाला नक्कीच मदत मिळणार आहे.

    ReplyDelete
  6. Hello Vaidehi..
    Nice recipes... Really reminds me of maharashtra.. I am from mumbai.. but a tamilian...Loved all ur recipes... Can u post the recipe of farali misal?... I had it once in a place near dadar station and i loved it... can u post it if u know the recipe..

    ReplyDelete
  7. Hi Chakali,

    Tumachya Recipe Mala Khup Avadtat!

    Thanks,

    Chinmay

    ReplyDelete
  8. Dear Vaidehi,

    All your recipes are excellent. I tried many one all was superb. This recipe is very different then all Upawas Faral, Thanks for nice recipe.

    With Best Regards,

    Rupa

    ReplyDelete
  9. hey thanks Rupa,
    Yeah it is little different recipe than other Fasting recipes. and do try this recipe at home, really tastes amazing :)

    ReplyDelete
  10. Hi vaidehi,

    Mast recipe ahe... tujhya saglyach recipes mala atishay avadtat.. kiti sopya ani sutsutit bhashet lihites... thanks a lot.. mala cooking chi atishay avad ahe ani tujhya ya recipes mule ti anikhi vadhli ahe... pls ashach navnavin recipes amchyashi share karat raha...
    Mi fan zalie ata tuzi :)

    Regards

    ReplyDelete
  11. he thalipith sabudanyashiway hou shakate ka..?

    ReplyDelete
  12. hi
    sabudanyashivay karayche asel tar shingadyache pith ghal..pan sabudana ghalun jashi chav yete tashi ekdum chan nahi yenar

    ReplyDelete
  13. Hi.................

    Khup chan Recepies aahet mala far aawadatat

    ReplyDelete
  14. he dose naram astat ka

    ReplyDelete
  15. Ho, he dose tandulachya doshasarkhe kurkurit nastat. naramach astat.

    ReplyDelete
  16. me tumchya blog chi fan ahe... kahitari vegle banvavese vatle ki ya blog cha nehmich upyog hot ala ahe..tumchya recipes ani tyanchi sangnyachi paddhat khupach chhan ahe.. ya mahashivratrisathi recipe shodhat hote he recipe milali,,, thanx a lot :)

    ReplyDelete
  17. hi...
    he thalipith varichya pithashivay karata yeil ka?

    ReplyDelete
    Replies
    1. ho pan tya aivaji dusre pith jase shingadyache kinva rajgiryache pith vaparu shakto

      Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item