मूगडाळीची कचोरी - Moogdal Kachori

Moogachi Kachori साहित्य: सारणासाठी: १ वाटी हिरवी मूगाची डाळ १ चमचा आले पेस्ट ३ हिरव्या मिरच्या/ लाल तिखट १ चमचा आमचूर पावडर १ चमचा...

Moogachi Kachori
kachori recipe, moogachi kachori, Mexican, Italian, Chinese, healthy Recipe, Easy Recipes

साहित्य:
सारणासाठी:
१ वाटी हिरवी मूगाची डाळ
१ चमचा आले पेस्ट
३ हिरव्या मिरच्या/ लाल तिखट
१ चमचा आमचूर पावडर
१ चमचा बडीशेप
१ चमचा गरम मसाला
दिड चमचा साखर
हिंग, हळद, कढीपत्ता
तेल
मिठ
आवरणासाठी:
२ वाट्या गव्हाचे पिठ
३-४ चमचे तेल
पिठ भिजवण्यासाठी पाणी
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) मूग डाळ ४-५ तास भिजत ठेवावी. भिजवलेली मूगडाळ जाड बुडाच्या पातेल्यात घेऊन १ वाटी पाण्यात उकळवावी. उकळवताना गॅस मध्यम असावा आणि पातेल्यावर झाकण ठेवावे. मूगडाळ अगदी नरम शिजवू नये. सर्व पाणी निघून जाऊ द्यावे. नंतर मूगडाळ थोडी चेचून घ्यावी.
२) गव्हाचे पिठाची कणिक भिजवावी. अगदी घट्ट किंवा अगदी सैल भिजवू नये. कणिक झाकून ठेवावी.
३) कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात हिंग, हळद, आले पेस्ट, मिरच्या/लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यानंतर मूगडाळ, गरम मसाला, बडीशेप, आमचूर पावडर, मिठ, साखर घालून ढवळावे. सारण थंड होवू द्यावे. हाताने एकत्र करावे म्हणजे ते मिळून येईल.
४) कणकेचे दोन-दोन इंचाचे गोळे करावे. गोल पुरीसारखे लाटावे. पुरी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने त्यात एक चमचा सारण घालावे आणि सर्व कडा एकत्र आणून व्यवस्थित बंद करावे. हे करत असतानाच तळणासाठी कढईत तेल गरम करत ठेवावे. मिडीयम हाय हिटवर कचोर्या गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळून काढाव्यात. या कचोर्या गरम असतानाच खाव्यात. थंड झाल्यावर चव फार चांगली लागत नाही.
या कचोर्या कोथिंबीर-पुदीना मिरचीच्या चटणीबरोबर किंवा चिंच खजूराच्या चटणीबरोबर अगदी झकास लागतात.

टीप:
१) गरम मसाल्याबरोबर २ चमचे गोडा मसाला (काळा मसाला) वापरल्यास चव छान येते.
२) आवडत असल्यास सारण परतताना काळ्या मनुका किंवा बेदाणे घालू शकतो.

Related

Snack 7679040963945418417

Post a Comment Default Comments

  1. Hello my name is Alpa Mulgund. I am seeking out possible link partners that
    our visitors would be interesting in visiting. I've found your blog to be a very good fit for our visitors. I would be more than happy to add your link in my blog http://indianrelish.blogspot.com.I am contacting you to see if it is ok ?If yes,please send in you linking details. Also, I would like to ask if you mind linking back to my newly created blog? If so, please use the linking details below and send me the location of our link on your blog.
    Here is my linking details:
    Anchor Text: Indian Recipes Corner
    Url : http://indianrelish.blogspot.com
    Description(Not necessary): Visit here for a wide range of delicacies in vegeterian and non vegeterian from india.

    Hope to hear from you soon.

    ReplyDelete
  2. Hi,
    Recipe avadali, pan baheril avaran khusakhushit honyasathi kaay karave?? pith nehamisarakhe, mhanaje polyanaa paahije tevadhe naram malale tar mag kachorya khuskhushit hotaat kaa?
    sadhanaa

    ReplyDelete
  3. hi anonymous,
    कणिक थोडी घट्टच भिजवावी. सैल भिजवल्यास कव्हर नरम होईल. आणि या कचोर्या गरमच खायच्या असतात. थंड करून खाल्ल्यास चव चांगली लागत नाही.

    ReplyDelete
  4. नमस्कार, प्रिंट काढून पाककृती अभ्यासाला दिली.आज आपल्या पाककृतीमुळे जरा कचोरी चाखता आली. मन:पूर्वक आभार.

    -दिलीप बिरुटे
    (आभारी)

    ReplyDelete
  5. Hi Vaidehi,
    Tu je sahitya vaprle ahes tyat sadharantha kiti kachorya bantil??

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item