स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२...

Stuffed Potato in English

वेळ: २५ मिनीटे
२ ते ३ जणांसाठी


साहित्य:
४ बटाटे (कच्चे)
तळण्यासाठी तेल
स्टफिंगसाठी
२५० ग्राम पनीर
१/२ चमचा चाट मसाला
थोडेसे मीठ
इतर साहित्य:
१/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून घ्यावे
१-२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१/२ वाटी कांदा, बारीक चिरून
१/४ वाटी टॉमेटो, मध्यम फोडी
बारीक शेव, सजावटीसाठी
थोडी हिरवी चटणी (ऐच्छिक)

कृती:
१) पनीर कुस्करून घ्यावे. मंद आचेवर नॉनस्टीक पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करून त्यात पनीर घालावे. काही सेकंदच परतावे. आच बंद करावी. पनीरला थोडे पाणी सुटेल ते काढून टाकावे. नंतर थोडेसे मीठ आणि चाट मसाला घालावा. चिरलेली कोथिंबीर घालावी. मिक्स करावे.
२) बटाटे मधोमध उभे कापून दोन सारखे भाग करावे. साल काढू नये. चमच्याने बटाटे मध्यभागी कोरून थोडा वाटीसारखा आकार करावा.
३) तेल गरम करावे. त्यात मध्यम आचेवर बटाटे तळून घ्यावे. आच मोठी ठेवू नये त्यामुळे बटाटे नीट तळले जात नाहीत, कच्चे राहतात.
४) बटाटे थोडे लालसर तळून घ्यावे. गरम असतानाच त्यात पनीरचे स्टफिंग भरावे. वर स्वीटकॉर्न, थोडीशी मिरची, कांदा, टॉमेटो, हिरवी चटणी आणि थोडी शेव घालावी. थोडी कोथिंबीर घालून टॉमेटो केचप बरोबर सर्व्ह करावे.

Related

Snack 8903120739348690788

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item