मलबार कॅश्यु कोकोनट स्ट्यू - Malbar Cashew Coconut Stew

Malbar Cashew Coconut Stew in English वेळ: २५ ते ३० मिनीटे वाढणी: १ साहित्य: १ कप नारळाचे घट्ट दूध १ लहान गाजर, मध्यम तुकडे ३-४ फ...

Malbar Cashew Coconut Stew in English

वेळ: २५ ते ३० मिनीटे
वाढणी: १


साहित्य:
१ कप नारळाचे घट्ट दूध
१ लहान गाजर, मध्यम तुकडे
३-४ फरसबी, मध्यम तुकडे
१ लहान बटाटा, सोलून मध्यम तुकडे
७० ग्राम पनीर, मध्यम तुकडे
५० ग्राम लाल भोपळा, लहान तुकडे
:::::मलबार मसाला::::
१ टिस्पून मिरीदाणे
१ टिस्पून लवंग
अर्धं चक्रीफुल
४-५ वेलची
३ टिस्पून बडीशेप
२ चिमटी जायपत्रीची पूड
२ चिमटी जायफळ पूड
१ दालचिनीची काडी
::::इतर साहित्य::::
१ टेस्पून बटर
१ टिस्पून आलं-लसूण पेस्ट
२ ते ३ टेस्पून कांदा, बारीक चिरून
१ टेस्पून काजू पेस्ट
चवीपुरते मीठ
तळलेले काजू सजावटीसाठी

कृती:
१) मसाल्याचे सर्व साहित्य थोडेसे भाजून घ्यावे. गार झाले की बारीक पावडर करून घ्यावी.
२) कढईत बटर गरम करावे. त्यात आले-लसूण पेस्ट आणि कांदा घालावा. मिनिटभर परतावे. नंतर बटाटा, गाजर, फरसबी घालून परतावे.
३) नारळाचे दूध आणि थोडेसे पाणी घालावे. काजू पेस्ट घालून ढवळावे.
४) भोपळा, पनीर, आणि १ चमचा मसाला घालावा. ५ ते ८ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. भाज्या शिजल्या की मीठ घालून आच बंद करावी.
५) स्ट्यू प्लेटमध्ये वाढावे. तळलेल्या काजूनी सजवावे. सर्व्ह करताना भाजलेला ब्राऊन ब्रेड आणि भात यांबरोबर सर्व्ह करावे.

Related

Stew 8927835888365713766

Post a Comment Default Comments

  1. Me chakalivarchya anek recipes kelya ahet aani sagalyach mast hotat. Ha stew tar along jhala. Mala eka chhotya party la typical jevan banvayche navate. Me he try kele. Apratim.

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item