वॅनिला फ्लोट - Juicy Vanilla Float
Juicy Vanilla Float in English वेळ: ५ मिनीटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: ४ ते ६ वॅनिला आईसक्रीम स्कूप ३ ग्लास मिक्स फ्रुट ज्यूस (आ...

वेळ: ५ मिनीटे
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
४ ते ६ वॅनिला आईसक्रीम स्कूप
३ ग्लास मिक्स फ्रुट ज्यूस (आवडीचा कुठलाही ज्यूस चालेल)
सजावटीसाठी
अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे
२ चमचे काजू, बदाम, पिस्ता यांचे काप
कृती:
१) ४ काचेचे सर्व्हिंग ग्लास घ्यावे. प्रत्येक ग्लास मध्ये आधी एकेक वॅनिला आईसक्रीम स्कूप घालावा.
२) त्यावर ग्लास भरेपर्यंत फ्रुट ज्यूस घालावा. ज्यूस घातल्यावर तळाला असलेले आईसक्रीम वर तरंगेल.
३) डाळिंबाचे दाणे आणि ड्राय फ्रुट्सनी सजवून लगेच सर्व्ह करावे.