जिंजर लेमन टी - Honey Ginger Tea
Ginger lemon Tea in English वेळ: १० मिनीटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: अडीच कप पाणी २ टी बॅग्स २ ते ३ चमचे मध लिंबाच्या २ चकत्या १/...

वेळ: १० मिनीटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
अडीच कप पाणी
२ टी बॅग्स
२ ते ३ चमचे मध
लिंबाच्या २ चकत्या
१/२ इंच आलं
कृती:
१) आल्याच्या पातळ चकत्या कराव्यात.
२) पातेल्यात पाणी घेउन त्यात आल्याच्या चकत्या घालाव्यात. उकळून घ्यावे.
३) कपमध्ये ओतून त्यात मध मिक्स करावा. कपात प्रत्येकी एक लिंबाची चकती आणि टी बॅग घालावी. चहा स्टीप झाला की टी बॅग काढून टाकावी.
४) चमच्याने ढवळून कोमटसर चहा प्यावा.
टीप:
१) यामध्ये पुदिन्याची किंवा तुळशीची पाने पाण्यात उकळताना घालू शकतो.