Manchurian Pizza

Manchurian Pizza in English वेळ: पूर्वतयारी- ३० मिनिटे | पाकृसाठी- १० ते १५ मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: २ पिझ्झा बेस २ टिस्पू...

Manchurian Pizza in English

वेळ: पूर्वतयारी- ३० मिनिटे | पाकृसाठी- १० ते १५ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी


साहित्य:
२ पिझ्झा बेस
२ टिस्पून शेजवान सॉस (शेजवान चटणी)
१/२ कप किसलेले चीज
१ पाती कांद्याची पाती, बारीक चिरून
:::मंचुरियनसाठी बॉल्ससाठी:::
३/४ कप एकदम बारीक चिरलेली कोबी
१/२ कप बारीक चिरलेली भोपळी मिरची
१ टिस्पून बारीक चिरलेली लसूण
१ टिस्पून बारीक चिरलेले आलं
१/४ टिस्पून सोया सॉस
२ ते ३ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१ टेस्पून मैदा
चवीपुरते मीठ
मंचुरियन बॉल्स तळण्यासाठी तेल
::::मंचुरियन ग्रेव्हीसाठी::::
२ टिस्पून तेल
दिड टिस्पून लसूण, बारीक चिरून
दिड टिस्पून आलं, बारीक चिरून
३-४ बेबी कॉर्न, थोडे जाडसर चिरून
१/४ कप भोपळी मिरची, पातळ उभी चिरून
२ टेस्पून कांदा, बारीक चिरून
१ टिस्पून कॉर्न फ्लोअर + १/४ कप पाणी
१/२ टिस्पून सोया सॉस
१/४ टिस्पून व्हिनेगर

कृती:
१) मंचुरियन बॉल्ससाठी कोबी, भोपळी मिरची, लसूण, आलं आणि थोडं मीठ एकत्र करून मायक्रोवेव्हमधे अर्धवट वाफवून घ्यावे.
२) थोडे निवले की पिळून त्यातील पाणी काढून ठेवावे. भाजीमध्ये आधी सोय सॉस आणि १ चमचा मैदा घालावा. नंतर कॉर्न फ्लोअर थोडे थोडे मिक्स करून गोळे बांधता येतील इतपतच पीठ घालावे. जास्त घातले तर तळल्यावर आतून कच्चे लागतात.
३) छोटे छोटे गोळे करून तेलात मंद आचेवर तळून घ्यावे. पेपरवर काढून ठेवावे. एका बॉलचे अर्धेअर्धे तुकडे करावे.
४) ग्रेव्हीसाठी कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण- आलं परतावे. त्यात बेबी कॉर्न, बारीक चिरलेला कांदा आणि उभी चिरलेली भोपळी मिरची परतावी. सोया सॉस घालावा. १ वाटी पाणी (भाज्यांचे पाणी यातच घालावे) घालावे. कॉर्न फ्लोअरचे मिश्रण ढवळून कढईत घालावे. तळलेले बॉल्स आणि व्हिनेगर घालावे. मंद आचेवर १-२ मिनिटे उकळी काढावी. ग्रेव्ही थोडी दाट असावी. लागल्यास १/२ चमचा कॉर्न फ्लोअर वाढवू शकतो.
५) पिझ्झा बेसवर थोडासा शेजवान सॉस पसरवावा. त्यावर मंचुरियन ग्रेव्ही आणि बॉल्स पसरवावे. वरून थोडे चीज पेरून ग्रील करावे.
६) तवा गरम करून घ्यावा. आच मंद ठेवावी, थोडं बटर घालावे. ग्रील केलेला पिझ्झा त्यावर ठेवून तळ थोडा कुरकुरीत करून घ्यावा.
कट करून पिझ्झा लगेच सर्व्ह करावा.

Related

Pizza 8045784530795299057

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item