पास्ता विथ कॉरियान्डर पेस्टो - Pasta with Coriander Pesto
Pasta with Coriander Pesto in English वेळ: २५ ते ३० मिनिटे २-३ जणांसाठी साहित्य: १०० ग्राम पास्ता १ टिस्पून मीठ व्हाईट सॉससाठी: ...
https://chakali.blogspot.com/2014/11/pasta-in-coriander-pesto.html
Pasta with Coriander Pesto in English
वेळ: २५ ते ३० मिनिटे
२-३ जणांसाठी
साहित्य:
१०० ग्राम पास्ता
१ टिस्पून मीठ
व्हाईट सॉससाठी:
१ टिस्पून बटर
१ टेस्पून मैदा
३/४ कप गरम दूध
चिमूटभर मिरपूड
२-३ चिमटी मीठ
भाज्या:
५-६ बटण मश्रुम्स, स्लाईस करून
१ मध्यम कांदा, स्लाईस करून
२ टिस्पून ऑलिव्ह ऑईल
१/४ टिस्पून मीठ
१/२ टिस्पून पास्ता मिक्स (स्पाईस ब्लेंड)
पेस्टोसाठी:
१ कप चिरलेली कोथिंबीर
२ टेस्पून ऑलिव्ह ऑईल
१०-१२ बदाम
३-४ लसूण पाकळ्या
२ टीस्पून लिंबाचा रस
चिमुटभर मिरपूड
चवीपुरते मीठ
इतर साहित्य:
किसलेले चीज
चिली फ्लेक्स
कृती:
१) मोठ्या पातेल्यात पाणी तापवून त्यात पास्ता आणि मीठ घालावे. पास्ता शिजवून घ्यावा. पास्ता शिजला की पाणी काढून टाकावे.
२) पेस्टो बनवण्यासाठी त्याखाली दिलेले साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. खूप घट्ट वाटले तर १-२ चमचे पाणी घालावे.
३) कढई घेउन त्यात २ टिस्पून ऑलिव्ह ऑईल गरम करावे. त्यात कांदा परतावा. नंतर मश्रुम आणि मीठ घालून परतावे. मश्रुम मऊ झाले की पास्ता मिक्स घालून मिक्स करावे. बाजूला काढून ठेवावे.
४) कढईत बटर गरम करून त्यात मंद आचेवर मैदा परतावा. काही सेकंद परतून दूध घालावे. भरभर मिक्स करून, गुठळ्या होवू न देता सॉस बनवावा. सॉसमध्ये मीठ आणि मिरपूड घालावी. पास्ता घालून मिक्स करावे.
व्हाईट सॉस आणि पास्ताच्या मिश्रणातच पेस्टो आणि भाज्या घालून मिक्स करता येईल. त्यावर चीज आणि चिली फ्लेक्स घालावे.
किंवा ओव्हनप्रूफ डिशमध्ये व्हाईट सॉस पास्ताचे मिश्रण आधी घालावे. त्यावर भाज्या आणि पेस्टो पसरावा. वरून चीज आणि चिली फ्लेक्स घालून ४-५ मिनिटे बेक (ब्रोईल) करावे.
गरमागरम पास्ता सर्व्ह करावा.