निवग्र्या - Nivegrya

Nivegrya in English वेळ: १५ ते २० मिनिटे १०-१२ मध्यम निवग्र्या गणेश चतुर्थीला नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक हे हमखास केले जातात. मोदक बनव...

Nivegrya in English

वेळ: १५ ते २० मिनिटे
१०-१२ मध्यम निवग्र्या

गणेश चतुर्थीला नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक हे हमखास केले जातात. मोदक बनवून झाल्यावर जर उकड उरली असेल तर या निवग्र्या बनवल्या जातात. तांदळाच्या उकडीला काही चव नसते. त्यामुळे त्यात थोडी मिरची जिरे घालून चविष्ट अशी निवग्री बनवता येते. यातून दोन हेतू साध्य होतात ते म्हणजे उकड वाया जात नाही आणि त्यापासून चविष्ट असा पदार्थ जेवणात खायला मिळतो. काही जणांना निवग्र्या इतक्या आवडतात की मुद्दाम जास्त उकड बनवून या पदार्थाचा आस्वाद घेतात.



साहित्य:
तांदळाची उकड - १ कप
२ टिस्पून हिरव्या मिरच्यांचा खर्डा
१/२ टिस्पून जिरे
चवीपुरते मिठ

कृती:
१) उकडीमध्ये मिरची पेस्ट, जिरे, आणि मिठ घालावे. नीट मळून घ्यावे. लिंबाएवढे गोळे करून चपटे करावे. किंवा गोळ्यात हाताचा अंगठा रोवून तसाच दाबत दाबत निवग्री वाटीच्या आकारात वाढवावी.
मोदक वाफवतो तसेच वाफवून घ्याव्यात.

टीप:
१) काहीजण हिरवी मिरची पेस्ट वापरण्याऐवजी लाल तिखट घालतात. तेही चालते. पण हिरव्या मिरचीचा स्वाद जास्त चांगला लागतो.

Related

Snack 5146990540987149624

Post a Comment Default Comments

  1. excellent! great way to use leftover Ukad

    ReplyDelete
  2. वैदेही मॅडम, तुम्ही मला ,म्हणजे आम्हा सर्वांना , मेयोनेझ सॉसची रेसिपी सांगण्याचे कबूल केले होते. आमची ही इच्छा काही अजून पुर्ण झालेली नाहे, म्हणुन पुन्हा एकदा तुम्हाला आठवण म्हणुन लिहीत आहे. वैदेही मॅडम, तुमच्या सर्व रेसिपीज अगदी ’ प्रुव्हन ’ असतात. तुम्ही दिलेल्या प्रमाणात सगळे जिन्न्स घेतले आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे पाककृती केली की पदार्थ हमखास उत्त्म होणारच याची खात्री असते. त्यामुळे आम्हाल तुमच्याकडून , बिनाअंड्याचा मेयोनेझ सॉस कसा करावा याची रेसिपी हवी आहे..तेव्हा प्लीज....!

    ReplyDelete
    Replies
    1. मी मेयॉनीज ची रेसिपी ट्राय करून पहिली पण अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही. म्हणून पोस्ट करू शकले नाही. जशी चांगली होईल तशी लगेच पोस्ट करेन.

      Delete
  3. Hi vaidehi.. Thanks for the idea. I"ll try next time.
    Ek vicharyach hot. He Nivegrya deep fry kele tar chalel kai?

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you...

      Deep fry karun chalnar nahi..karan ukad vafavleli aste..

      Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item