तांदळाचे गोड घावन - Sweet Pancakes

साहित्य: ३/४ कप तांदळाचे पीठ १/४ ते १/२ कप गुळ (चवीनुसार घालावा) १/२ कप ओलं खोबरं चिमटीभर मीठ भिजवण्यासाठी  पाणी (टीप पहा) तूप कृती:...

साहित्य:
३/४ कप तांदळाचे पीठ
१/४ ते १/२ कप गुळ (चवीनुसार घालावा)
१/२ कप ओलं खोबरं
चिमटीभर मीठ
भिजवण्यासाठी  पाणी (टीप पहा)
तूप

कृती:
१) तांदळाचे पीठ, गुळ, खोबरं, मीठ आणि पाणी एकत्र करून गुळ विरघळवून घ्यावा. डोशाच्या पीठाइतपत पातळ असावे.
२) नॉनस्टीक तवा गरम करावा. त्यावर तूप सोडून घावन घालावे. मंद आचेवर झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढावी.
३) झाकण काढून दोन्ही बाजूंनी घावन खरपूस करून घ्यावे.
घावन गरमच खावे. बाजूला थोडे कैरीचे लोणचे चव-बदल म्हणून खाता येते.

टीप:
१) ओलं खोबरं वापरण्याऐवजी नारळाच्या दुधात जर पीठ भिजवले तरी छान चव येते.
२) ही घावनं थोडी नाजूक होतात कारण गुळ आच लागल्यावर वितळतो. यामुळे नॉनस्टीक तवा वापरला तर तव्याला चिकटत नाहीत. हलक्या हाताने पलटवावी.

Related

Snack 6978395375004206207

Post a Comment Default Comments

  1. namsakar Vaidehi
    gull n takata sakar chalale ka?

    ReplyDelete
  2. Hi Vaidehi....samja ola khobar nasel tar dusra kay option ahey ka?? Devki

    ReplyDelete
    Replies
    1. Ola khobra nasel tar naralache dudh vaparu shakto.
      tehi agdi nasel tar sadhe dudh vaparle tari chalel. Pan naralachya dudhache kinva naralamule chav jast chaan ani khamang lagte.

      Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item