गाजराची खीर - Gajarachi Kheer

Carrot Kheer in English वेळ: साधारण ३०-३५ मिनिटे वाढणी: ५-६ जणांसाठी साहित्य: १/२ किलो गाजर १ लिटर दूध १/४ ते १/२ कप साखर १/४ टिस्...

Carrot Kheer in English

वेळ: साधारण ३०-३५ मिनिटे
वाढणी: ५-६ जणांसाठी


साहित्य:
१/२ किलो गाजर
१ लिटर दूध
१/४ ते १/२ कप साखर
१/४ टिस्पून वेलची पावडर
१ टिस्पून तूप
२ टेस्पून पिस्ता, बदाम काजू यांचे काप

कृती:
१) गाजरं धुवून किसून घ्यावी. एका जाड पातेल्यात तूप गरम करून त्यावर किसलेले गाजर परतावे. मंद आचेवर २-३ मिनिटे वाफ काढावी.
२) गाजर थोडी मऊ झाली कि दूध घालावे आणि काही मिनिटे उकळवावे. आता साखर आणि ड्राय फ्रुट्स घालावी. मंद आचेवर शिजू द्यावे. गरजेएवढा दाटपणा आला कि वेलची पूड घालावी. ढवळून आच बंद करावी.
ही खीर गार किंवा गरम कशीही चांगलीच लागते.

Related

Sweet 3389900458383845255

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item