वांग्याच्या भरताचे पोहे - Bharitache Pohe

vangi Pohe in English वेळ: १० ते १५ मिनिटे वाढणी: ४ साहित्य: दिड कप जाड पोहे (४ मुठी) १/२ ते पाउण कप भाजलेल्या वांग्याचा गर (टीप) ...

vangi Pohe in English

वेळ: १० ते १५ मिनिटे
वाढणी: ४


साहित्य:
दिड कप जाड पोहे (४ मुठी)
१/२ ते पाउण कप भाजलेल्या वांग्याचा गर (टीप)
२ मध्यम कांदे, बारीक चिरून
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
१ टिस्पून ठेचलेली मिरची
२ टिस्पून लिंबाचा रस (ऐच्छिक)
१ टिस्पून साखर
चवीपुरते मीठ
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) पोहे चांगले भाजून घ्यावे. कुरकुरीत झाले पाहिजेत.
२) भाजलेले पोहे परातीत काढावेत. लहान कढल्यात तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करावी. तयार फोडणी पोह्यांवर घालावी.
३) कांदा, लिंबाचा रस, मिरची, कोथिंबीर, मीठ आणि साखर घालावी. चमच्याने हलवून त्यात वांग्याचा गर घालावा. हाताने कालवून मिक्स करावे.
लगेच खायला द्यावे.

टीप:
१) भाजलेलं वांगं सोलून त्याचा गर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावा. लागेल तेव्हा भरीतसुद्धा करता येते किंवा अशा प्रकारचे पोहेसुद्धा बनवता येतील. फक्त हा गर मायक्रोवेव्हमध्ये थोडा गरम करून मग वापरावा. नाहीतर पोहे खूप गार लागतील.

Related

Snack 5796728437151132502

Post a Comment Default Comments

item