पनीर बेबीकॉर्न साते - Paneer Babycorn Satay

Paneer Babycorn Satay in English वेळ: ३० ते ३५ मिनिटे वाढणी: ३-४ जणांसाठी साहित्य: २०० ग्राम पनीर, मध्यम चौकोनी तुकडे १ मध्यम सिमला ...

Paneer Babycorn Satay in English

वेळ: ३० ते ३५ मिनिटे
वाढणी: ३-४ जणांसाठी


साहित्य:
२०० ग्राम पनीर, मध्यम चौकोनी तुकडे
१ मध्यम सिमला मिरची, मध्यम चौकोनी तुकडे (१ मिनिट मायक्रोवेव्ह करावे)
८ ते १० बेबी कॉर्न, दिड इंचाचे तुकडे (१ मिनिट मायक्रोवेव्ह करावे)
::::मॅरीनेशनसाठी::::
१ टिस्पून करी पावडर (माझ्याकडे करी पावडर नव्हती, मी गरम मसाला वापरला आणि त्यात १/४ टिस्पून हळद मिक्स करून ते वापरले)
दिड टिस्पून लेमन ज्यूस
२ टिस्पून मध
१ टेस्पून तेल
आणि चवीपुरते मीठ
::::इतर साहित्य:::
लिंबाच्या फोडी
चाट मसाला
मीठ
लाल तिखट
पीनट सॉस
आणि टूथपिक्स

कृती:
१) मॅरीनेशन या लेबलखाली दिलेले सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात पनीर, सिमला मिरची, बेबी कॉर्न, हळद (गरम मसाला वापरल्यास), आणि लाल तिखट (ऐच्छिक) घालून मिक्स करावे. सर्व मॅरीनेशन पनीर सिमला मिरची आणि बेबी कॉर्न यांना चांगले लागेल असे मिक्स करावे. आणि १५ मिनिटे तसेच ठेवावे.
२) तोवर पीनट सॉस बनवावा.
३) टूथपिक्स घेउन त्यात सिमला मिरचीचा तुकडा, पनीरचा तुकडा आणि बेबीकॉर्नचा तुकडा असे ओवावे. अशाप्रकारे सर्व साते स्टिक्स तयार कराव्यात.
४) नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करावे. मोठ्या आचेवर, २ ते ३ भागात सातेस्टिक्स परतून घ्याव्यात. पनीरचा रंग बदलला कि बाहेर काढाव्यात.
५) सर्व्हिंग प्लेटमध्ये अरेंज करावेत. त्यावर चाट मसाला, लाल तिखट, लिंबाचा रस आणि थोडे मीठ भुरभुरावे. गरमागरम पनीर बेबीकॉर्न साते पीनट सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

टीप:
१) जेव्हा सातेस्टिक्स परततो तेव्हा पनीर लगेच ब्राऊन होते. बेबीकॉर्न आणि सिमला मिरची कच्चीच राहते. काहीजणांना तसे आवडतेही. म्हणून जर आवडत असेल तर मायक्रोवेव्हमध्ये शिजवू नये.

Related

Paneer 4979119379371577270

Post a Comment Default Comments

  1. Hi,
    I love baby corns but I never find them..Can you share where do you get then in States

    Thanks

    ReplyDelete
    Replies
    1. You will get them in oriental market (Asian grocery store). Sometimes fresh or canned babycorns are available in Indian grocery stores too.

      Delete
  2. hi Vaidehi tai,

    I just lovvvve u r recepis as i tried many of them that turned out soo tasty misal,pav bhaji,modak,pooran poli, n many more..i was planning for my daughters birthday party with 30 people total...could u please suggest any menu for starters n main course...

    ReplyDelete
    Replies
    1. Hello Naina,
      My apologies for replying late.
      Due to some inevitable reason, I was not able to update my blog, also couldn't check emails and comments related to blog. If you need any help in future please feel free to post in comment.
      I hope you had a great birthday party..

      Delete

item