आलू मटार - Aloo Matar

Aloo Matar in English वेळ: २० मिनिटे वाढणी: ३ ते ४ जणांसाठी साहित्य: दीड कप मटार ३ मोठे बटाटे, सोलून मध्यम चौकोनी तुकडे २ मध्यम कां...

Aloo Matar in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी


साहित्य:
दीड कप मटार
३ मोठे बटाटे, सोलून मध्यम चौकोनी तुकडे
२ मध्यम कांदे, बारीक चिरून
१ टिस्पून धणेपूड
१/४ टिस्पून जिरेपूड
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, १/४ टिस्पून जिरे, २ चिमटी हिंग, २ चिमटी हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून किसलेले आले
१/४ टिस्पून आमचूर पावडर
१/२ टिस्पून गरम मसाला (ऐच्छिक)
१/२ कप दही, फेटलेले
चवीपुरते मीठ

कृती:
१) कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. कांदा आणि १/२ चमचा मीठ घालून लालसर होईस्तोवर परतावे.
२) मटार आणि बटाटे घालावे. पाण्याचे झाकण ठेवून वाफ काढावी. मटार आणि बटाटा शिजले की त्यात आले, आमचूर पावडर, धणेपूड आणि जिरेपूड घालावे.
३) आच मंद करून दही घालावे. भरभर ढवळावे. लागल्यास थोडेसे पाणी घालावे. चव पाहून मीठ, लाल तिखट वाढवावे. तसेच गरम मसाला वापरणार असाल तर आत्ता घालावा. झाकण ठेवून २ मिनिटे मंद आचेवर उकळू द्यावे.

Related

Potato 1472725076660398342

Post a Comment Default Comments

item