केळी पाक - Keli Pak

Kelipak in English वेळ: १० मिनिटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: १ कप साखर १/२ कप पाणी १ पिकलेले केळे १ चिमटी केशर १/४ टिस्पून...

Kelipak in English

वेळ: १० मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी


साहित्य:
१ कप साखर
१/२ कप पाणी
१ पिकलेले केळे
१ चिमटी केशर
१/४ टिस्पून वेलची पूड
चारोळी, पिस्ते, वगैरे आवडीनुसार

कृती:
१) साखर आणि पाणी एकत्र करून उकळवावे. साखर विरघळून पाक थोडासा चिकट झाला कि त्यात चिरलेले केळे घालून मंद आचेवर शिजू द्यावे. तेव्हाच चारोळी, पिस्त्याचे काप घालावे.
२) पाक थोडा दाटसर झाला कि त्यात वेलचीपूड आणि केशर घालावे. ढवळून आचेवरून उतरवावे.
केळीपाक पुरीबरोबर छान लागतो.

टीप:
१) केळे घातले असल्याने त्याचा स्वाद छान लागतो, लिंबाची गरज पडत नाही. पण आवडत असल्यास लिंबाचा रस पाक गार झाल्यावर घालावा.

Related

Sweet 8195188378320951041

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item