क्रीम ऑफ मश्रुम्स - Cream of Mushrooms

Cream of Mushrooms in English वेळ १० ते १५ मिनिटे वाढणी : १ साहित्य: ८ ते १० बटण मश्रुम्स (मध्यम आकाराचे) (साधारण १ कप स्लाईसेस) १...

Cream of Mushrooms in English

वेळ १० ते १५ मिनिटे
वाढणी : १


साहित्य:
८ ते १० बटण मश्रुम्स (मध्यम आकाराचे) (साधारण १ कप स्लाईसेस)
१ टिस्पून बटर
१-२ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
२ टेस्पून चिरलेला कांदा
१/४ कप पाणी
१/२ कप दूध
२ टिस्पून मैदा
१ टेस्पून क्रीम
१/८ टिस्पून मिरपूड
३ चिमटी ड्राय बेसिल + ड्राय ओरेगानो + गार्लिक पावडर (मी डॉमिनो'ज पिझ्झा बरोबर येणारे इटालियन सिझनिंग वापरले)
चवीपुरते मीठ

कृती:
१) दुध आणि मैदा एकत्र करून घ्यावे. गुठळी राहू देऊ नये.
२) कढईत बटर गरम करावे. त्यात लसूण परतावे. कांदा लालसर होईस्तोवर परतावा. नंतर मश्रुमचे स्लाईस आणि मीठ घालावे. मिनिटभर परतावे.
३) मश्रुम आळले कि पाणी घालावे. पाण्याला उकळी फुटली कि दूध आणि मैद्याचे मिश्रण घालावे (कढईत घालण्याआधी ढवळून घ्यावे). मंद आचेवर शिजवावे. गुठळ्या होवू नये म्हणून ढवळावे. २ मिनिटांनी क्रीम घालावे.
४) २-३ मिनिटे उकळू द्यावे. जर सूप खूप घट्ट वाटले तर दूध घालून १ उकळी काढावी.
५) चवीपुरते मीठ, इटालियन सिझनिंग आणि काळी मिरपूड घालून मिक्स करावे.
गरमागरम सर्व्ह करावे.

Related

Winter 7961422492319195204

Post a Comment Default Comments

item