वांगी पोहे - Vangi Pohe

Vangi Pohe in English वेळ: १५ मिनिटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: २ कप जाडे पोहे ४ ते ५ लहान वांगी फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/४ टिस...

Vangi Pohe in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी

साहित्य:
२ कप जाडे पोहे
४ ते ५ लहान वांगी
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद
१ डहाळी कढीपत्ता
२ ते ३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१/२ टिस्पून साखर
चवीपुरते मीठ
कोथिंबीर, बारीक चिरून

कृती:
१) वांगी धुवून प्रत्येकाचे ४ ते ६ तुकडे करावेत. पाण्यात बुडवून ठेवावे.
२) पोहे धुवून चाळणीत निथळत ठेवावे. वर ताटली टाकून झाकून ठेवावे.
३) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून खमंग फोडणी करावी. काही सेकंद परतून वांगी पाण्यातून काढून फोडणीस टाकावी. ढवळून त्यावर झाकण ठेवावे. मंद आचेवर २-३ मिनिटे वाफ काढावी.
४) वांग्याचे तुकडे बऱ्यापैकी शिजले की भिजवलेले पोहे घालावे. नीट मिक्स करून मिठ साखर घालावे. मंद आचेवर २-३ मिनिटे वाफ काढावी.

टीप:
१) पोहे बनवताना जास्त वेळ शिजवत ठेवू नयेत. यामुळे पोहे कडकडीत होण्याची शक्यता असते.

Related

Snack 3128964969172694122

Post a Comment Default Comments

item