रताळ्याचे काप - Ratalyache God Kaap

Ratalyache Kaap in English वेळ: १० ते १५ मिनिटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: पाव किलो रताळी १ टेस्पून तूप (किंवा जास्त) साखर (स...

Ratalyache Kaap in English

वेळ: १० ते १५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

साहित्य:
पाव किलो रताळी
१ टेस्पून तूप (किंवा जास्त)
साखर (स्टेप १ पहा)
१/२ टिस्पून वेलची पूड
१/४ कप ताजा खवलेला नारळ
ड्राय फ्रुट्स (काजू, पिस्ता, बेदाणे)

कृती:
१) रताळी स्वच्छ धुवून घ्यावी. बटाट्याच्या करतो तशा पातळ काचऱ्या कराव्यात. (१ कप काचऱ्या असतील तर १/२ कप साखर वापरावी.)
२) तूप कढईत गरम करावे. त्यात ड्राय फ्रुट्स तळून बाजूला काढावीत. त्याच तुपात रताळी परतावीत, नारळ घालावा. झाकण ठेवून १-२ मिनिटे वाफ काढावी. नंतर शिजेस्तोवर नुसते परतावे.
३) काचऱ्या शिजल्या की साखर घालून हलक्या हाताने मिक्स करावे. साखर वितळली की थोडावेळ परतावे म्हणजे रताळी छान खरपूस होतील.
एकदम गरम वाढू नये(साखरेच्या पाकामुळे चटका बसतो) किंचित निवाले की वाढावे.

टीप:
१) साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकतो.

Related

Sweet Potato 8695242367319188163

Post a Comment Default Comments

  1. gul ghalun kase karayache?

    ReplyDelete
    Replies
    1. Varil pramanech karayche.
      Gul barik chirun ghyaycha.. ani mag vaparaycha.. fakt sakharepeksha praman thode kami ghyave. chav pahun vatalyas vadhavave.

      Delete

item