पडवळाची भजी - Padwal Bhajji

Padwal Pakoda in English  वेळ: १५ मिनिटे वाढणी: ३ ते ४ जणांसाठी साहित्य: पाव किलो पडवळ (कोवळा) ३/४ कप बेसन ३ टेस्पून कोथिंबीर, बार...

Padwal Pakoda in English 

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

साहित्य:
पाव किलो पडवळ (कोवळा)
३/४ कप बेसन
३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१/४ टिस्पून हळद
१/४ चमचा हिंग
दीड टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून ओवा
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) बेसनात हळद, हिंग आणि लाल तिखट घालून मिक्स करावे. पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवावे. त्यात ओवा, कोथिंबीर आणि मिठही घालावे. पिठाची चव पाहून गरजेनुसार मिठ किंवा तिखट घालावे.
२) पडवळाच्या आतील बिया आणि भुसभुशीत भाग चमच्याच्या मागील बाजूने कोरून काढावा. पडवळाच्या पातळ चकत्या कराव्यात.
३) पडवळाच्या चकत्या अर्धवट वाफवून घ्याव्यात. (मी मायक्रोवेव्हमध्ये, पाण्याचा हबका मारून दीड मिनिट झाकण ठेवून वाफवल्या. वाफवून झाल्यावर झाकण लगेच काढावे.)
४) तेल गरम करावे व नंतर मध्यम आचेवर ठेवावे. वाफवलेल्या चकत्या पिठात घालून तेलात सोडाव्यात. सोनेरी रंगावर भजी तळाव्यात.

टीपा:
१) पडवळ कोवळेच हवे. जुन पडवळाला आत दोरे असतात ज्यामुळे भजी कचकचीत लागेल. तसेच जाड चकत्या करू नयेत.
२) बटाटा भजीप्रमाणे पडवळ थेट तळल्यास पूर्ण शिजत नाही, किंचित कच्चे राहतेच. म्हणून आधीच थोडेसे वाफवलेले चांगले.

Related

Snake Gourd 2880343742282614499

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item