मक्याची भाकरी - Makyachi Bhakari
Makkedi Roti in English वेळ: १५ ते २० मिनिटे ६ भाकऱ्या साहित्य: ५ वाट्या मक्याचे पीठ गरम पाणी १/२ चमचा मिठ तूप किंवा लोणी कृती: ...

वेळ: १५ ते २० मिनिटे
६ भाकऱ्या
साहित्य:
५ वाट्या मक्याचे पीठ
गरम पाणी
१/२ चमचा मिठ
तूप किंवा लोणी
कृती:
१) मक्याचे पीठात मिठ व गरम पाणी घालून पीठ मध्यम मळून घ्यावे. पीठाचे ८ समान भाग करावे.
२) तवा गरम करून आच मंद करावी. कोरडे पीठ घेउन नेहमी करतो तशी भाकरी थापावी किंवा लाटावी. जास्त पिठाची बाजू वर ठेवून भाकरी तव्यावर टाकावी. वरती पाण्याचा हात फिरवावा. आच मोठी करावी. पाणी थोडे सुकत आले की कालथ्याने बाजू बदलावी. नंतर थेट आचेवर भाकरी फुलवावी.
[भाकरी आचेवर फुलवायची नसेल तरी तव्यावरसुद्धा भाजू शकतो. भाकरीला कुठेही कालथ्याचे टोक लागू देऊ नये. थोडे जरी छिद्र पडले तरी भाकरी फुगत नाही.]
तयार भाकरीवर तूप किंवा लोणी घालावे. सरसो का साग (मोहोरीच्या पानाची भाजी) बरोबर ही भाकरी छान लागते.
टीप:
१) भाकरीचे पीठ मळल्यावर लगेच भाकऱ्या कराव्यात. पोळीच्या पिठासारखे मळून ठेवू नये.