व्हेज मोमोज - Vegetable Momos
Veg Momoes in English वेळ: ४५ मिनिटे १५ मोमोज साहित्य: ::::कव्हरसाठी:::: दीड कप मैदा १/२ टिस्पून मिठ २ टिस्पून तेल सारण: १ टेस...
https://chakali.blogspot.com/2013/06/vegetable-momos.html?m=1
Veg Momoes in English
वेळ: ४५ मिनिटे
१५ मोमोज
साहित्य:
::::कव्हरसाठी::::
दीड कप मैदा
१/२ टिस्पून मिठ
२ टिस्पून तेल
सारण:
१ टेस्पून तेल
१/२ कप कोबी, १/२ कप गाजर, १ भोपळी मिरची, ६- ७ लसूण पाकळ्या, १/२ इंच आल्याचा तुकडा, १ हिरवी मिरची - एकदम बारीक चिरून घ्यावे.
१/४ टिस्पून मिरपूड
१ टिस्पून सोया सॉस
चवीपुरते मिठ
कृती:
१) कव्हर बनवून घ्यावे. त्यासाठी मैदा, मिठ, तेल एकत्र करून पाणी घालून पीठ मळून घ्यावे. झाकण ठेवून १५-२० मिनिटे ठेवावे.
२) सारण बनवण्यासाठी कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण आले आणि मिरची परतून घ्यावी. सर्व भाज्या एकत्र घालाव्यात. मोठ्या आचेवर १-२ मिनिटे परताव्यात. त्यात मिठ, मिरपूड आणि सोया सॉस घालावा. तयार सारण एका वाडग्यात काढून घ्यावे.
३) भिजवलेल्या मैद्याचे १ इंचाचे छोटे गोळे करावे. त्याची पातळ पोळी लाटून घ्यावी. मध्यभागी १-२ चमचे सारण ठेवावे. एक कड हातात घेउन मध्यभागी आणावी. छोट्या-छोट्या चुण्या करून पहिल्या चुणीच्या मागे चिकटवाव्यात. अशाप्रकारे गोल पूर्ण करावा. तसेच करंजीच्या आकारातही मोमोज बनवता येतात. तयार झालेले मोमोज पिळून घेतलेल्या ओल्या कपड्याखाली ठेवावेत. सर्व मोमोज बनवून घ्यावेत.
४) इडली पात्रात पाणी उकळवत ठेवावे. इडली स्टॅंडला तेलाचा हात लावावा. त्यावर मोमोज ठेवून १०-१२ मिनिटे वाफवून घ्यावे. ५ मिनिटांनी इडली पात्र उघडून मोमोज काढावेत.
गरमागरम मोमोज चिली सॉस किंवा शेजवान सॉस बरोबर सर्व्ह करावेत.
टीपा:
१) मोमोज उकडण्याऐवजी तळू शकतो.
२) सारणामध्ये पनीर, टोफू, किंवा नॉन-व्हेजिटेरियन्ससाठी चिकनचे छोटे पिसेस घालू शकतो.
Nutritional Info: (per serving) (Considering 15 momos)
Calories: 79| Carbs: 14 g | Fat: 2 g | Protein: 2 g | Sat. Fat: 0 g | Sugar: 2 g
Yummy Vegetable Momoes. Nice picture.
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteTu calories kasha count kelya?
Also - Me hya blog la subscribe kela pan mala kadhich updates milat nahit.
Cheers
Hi
ReplyDeleteI prepared Momos according to your receipe and it was instant Hit at home.
Thank you so much.
- Suruchi Bhide
Dhanyavad Suruchi :smile:
DeleteMomos chi chatani recipe pn sanga naa
ReplyDeletenakki post karen
ReplyDelete