कैरी चणा डाळ चटणी - Kairi Chana Dal Chutney

Chana Dal Chutney in English वेळ: ५ मिनिटे (डाळ भिजवण्यासाठी २ तास) वाढणी: ३ ते ४ जणांसाठी साहित्य: ३/४ कप भिजवलेली चणाडाळ २ टेस्पून ...

Chana Dal Chutney in English

वेळ: ५ मिनिटे (डाळ भिजवण्यासाठी २ तास)
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

साहित्य:
३/४ कप भिजवलेली चणाडाळ
२ टेस्पून सोलून किसलेली कैरी
२ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/४ चमचा हिंग, १/४ चमचा हळद
चवीपुरते मिठ

कृती:
१) भिजवलेली चणाडाळ, मिरच्या, कैरी, आणि मिठ एकत्र मिक्सरमध्ये वाटावे. थोडेसे पाणी घालून किंचित रवाळ वाटावी.
२) कढल्यात तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. ही फोडणी तयार  चटणीवर घालावी. मिक्स करावे.
जेवणात बदल म्हणून नेहमीच्या चटणीपेक्षा ही चटणी छान लागते.


Nutritional Info: (per serving) (Considering 2 servings)
Calories: 35| Carbs: 2 g | Fat: 3 g | Protein: 1 g | Sat. Fat: 0 g | Sugar: 0 g

Related

Marathi 1154351793837668769

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item