फ्राईड वॉनटॉन्स - Fried Wontons

Fried Wontons in English वेळ: पूर्वतयारीसाठी-३५ मिनिटे | कृतीसाठी: २० मिनिटे १५ मध्यम वॉनटॉन्स साहित्य: ::::सारण:::: १ मध्यम गाजर १...

Fried Wontons in English

वेळ: पूर्वतयारीसाठी-३५ मिनिटे | कृतीसाठी: २० मिनिटे
१५ मध्यम वॉनटॉन्स


साहित्य:
::::सारण::::
१ मध्यम गाजर
१ मध्यम भोपळी मिरची
३/४ कप कोबी, पातळ चिरून
५-६ फरसबी
३ मश्रुम्स
१/४ कप टोफू, छोटे तुकडे
२ पाती कांद्याच्या काड्या
२ हिरव्या मिरच्या
१ टेस्पून लसूण, बारीक चिरलेली
२ टिस्पून आले, बारीक चिरून
२ टिस्पून सोया सॉस
चवीपुरते मिठ
१ टेस्पून तेल
::::कव्हरसाठी::::
१ कप भरून मैदा
१/२ टिस्पून मिठ
इतर साहित्य: तळण्यासाठी तेल

कृती:
१) सारणासाठी गाजर, भोपळी मिरची, कोबी, फरसबी, मश्रुम्स, टोफू, मिरची आणि पाती कांदा बारीक चिरून घ्यावा. कढईत तेल गरम करावे. त्यात आले-लसूण परतावे. त्यात पातीकांदा परतावा.
२) नंतर सर्व भाज्या मोठ्या आचेवर एखाद मिनिट परताव्यात. सोया सॉस आणि मिठ घालावे. हे सारण वाडग्यात काढून ठेवावे.
३) मैदा, मिठ आणि पाणी एकत्र करून पीठ मळावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर मध्यम आकाराच्या द्राक्षाएवढे गोळे करावे (२ सेमी). कॉर्न फ्लोअर लावून पातळ लाटावेत.
४) लाटलेल्या पारीच्या मध्यभागी १ लहान चमचा सारण ठेवावे. अर्ध्या पारीच्या कडेला पाण्याचे बोट लावावे. करंजीसारखे दुमडून सील करावे. दोन कडा मागच्या बाजूने एकत्र जुळवाव्यात. अशाप्रकारे सर्व वॉनटॉन्स बनवून घ्यावे.
५) कढईत तेल गरम करून आच मध्यम करावी. मध्यम आचेवर तयार वॉनटॉन्स सोनेरी रंगावर तळून घ्यावे.

टीपा:
१) भाज्या शक्य तेवढ्या बारीक चिराव्यात पण किसू नयेत. किसल्याने टेक्श्चर छान येत नाही तसेच जाड चिरलेल्या भाज्यांमुळे वॉनटॉन्स फाटतात.
२) सारणामध्ये चिकनचे किंवा क्रॅबचे वाफवलेले तुकडे घालू शकतो.

Related

Snack 1264126665449425677

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item