खारी लस्सी - kharee Lassi

Khari Lassi in English   वेळ: ५ मिनिटे वाढणी: ३ ते ४ जणांसाठी साहित्य: अडीच कप दही दीड ते दोन कप पाणी १/२ टिस्पून सैंधव मिठ १/२ ...


वेळ: ५ मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
साहित्य:
अडीच कप दही
दीड ते दोन कप पाणी
१/२ टिस्पून सैंधव मिठ
१/२ टिस्पून जिरेपूड
चवीपुरते मिठ

कृती:
१) दही आणि पाणी दोन्ही शक्यतो थंड घ्यावे. दही घुसळून घ्यावे. दही नीट घुसळले की त्यात पाणी, सैंधव मिठ, जिरेपूड आणि साधे मिठ घालून परत घुसळावे किंवा मिक्सरमध्ये फिरवावे.
थंडगार खारी लस्सी सर्व्ह करावी.

टीपा:
१) कोथिंबीर किंवा पुदिना बारीक चिरून किंचित मिठ घालून चुरडून घ्यावे. लस्सीमध्ये घालून मिक्स करावे. छान चव येते.
२) थोडासा लिंबाचा किंवा आल्याचा रस घातल्यास छान चव येते.

Related

North Indian 8861333971914351274

Post a Comment Default Comments

item